agriculture news in marathi, cotton plantation planning, aurangabad, maharashtra | Agrowon

औरंगाबाद, जालना, बीडमध्ये कापूस लागवड घटण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 मे 2018
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन पारंपरिक कापूस उत्पादक जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. तीन जिल्ह्यांत कपाशी क्षेत्रात घट प्रस्तावित करण्यात आली असली, तरी मराठवाड्यातील एकूण कपाशी लागवड क्षेत्रात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. 
 
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या आठ जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १७ लाख ७७ हजार हेक्‍टर आहे. २०१७ मधील खरिपात मराठवाड्यात १५ लाख ९२ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती.
 
औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन पारंपरिक कापूस उत्पादक जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. तीन जिल्ह्यांत कपाशी क्षेत्रात घट प्रस्तावित करण्यात आली असली, तरी मराठवाड्यातील एकूण कपाशी लागवड क्षेत्रात वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. 
 
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या आठ जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १७ लाख ७७ हजार हेक्‍टर आहे. २०१७ मधील खरिपात मराठवाड्यात १५ लाख ९२ हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती.
 
त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ४ लाख ७ हजार, जालना जिल्ह्यात २ लाख ७९ हजार, बीड जिल्ह्यात ३ लाख ६२  हजार, लातूर जिल्ह्यात ५ हजार, उस्मानाबाद जिल्ह्यात २३ हजार, नांदेड जिल्ह्यात २ लाख ७० हजार, परभणी जिल्ह्यात १ लाख ९२ हजार तर हिंगोली जिल्ह्यात ५४ हजार हेक्‍टरचा समावेश होता.
 
येत्या खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र १६ लाख २१ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यातील कपाशीच्या क्षेत्रात घट प्रस्तावित करण्यात आली आहे. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेले मोठे नुकसान यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा ३ लाख ७७ हजार, जालना २ लाख १ हजार तर बीड जिल्ह्यात ३ लाख ३० हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील कपाशीचे क्षेत्र ५ हजार हेक्‍टरवरच प्रस्तावित करण्यात आले असून उस्मानाबाद जिल्ह्यात ३० हजार,  नांदेड जिल्ह्यात ३ लाख ३८ हजार, परभणीत २ लाख २० हजार तर हिंगोली जिल्ह्यात १ लाख २० हजार हेक्‍टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. 
 
प्रस्तावित  करण्यात आलेल्या १६ लाख २१ हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी ६५ लाख ३९ हजार कापूस बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये  ६७ हजार बीजी १ तर ६४ लाख १६ हजार बीजी २ व ५६ हजार नॉन बीटी कपाशी वाणांच्या बियाण्यांची गरज लागणार आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यात १८ लाख ८६ हजार, जालना ८ लाख २८ हजार, बीड १३ लाख २० हजार, लातूर २४ हजार, उस्मानाबाद १ लाख ३ हजार, नांदेड १२ लाख ५३ हजार, परभणी ९ लाख ७ हजार तर हिंगोली जिल्ह्यासाठी २ लाख १८ कपाशी बियाणे पाकिटांची गरज भासणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...