agriculture news in marathi, cotton plantation planning, yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 मे 2018
यवतमाळ  : कापूस पिकावर सातत्याने येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात एक लाख हेक्‍टरने घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाने खरीप नियोजन अहवालात व्यक्त केली आहे. 
 
कापूस जिल्ह्यातील हुकमी पीक. या पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन अवलंबून असते. मात्र, मागील वर्षापासून पिकावर होणारे किडींचे आक्रमण, कापसाला नसलेला हमीभाव, लागणारा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
 
यवतमाळ  : कापूस पिकावर सातत्याने येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात एक लाख हेक्‍टरने घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाने खरीप नियोजन अहवालात व्यक्त केली आहे. 
 
कापूस जिल्ह्यातील हुकमी पीक. या पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन अवलंबून असते. मात्र, मागील वर्षापासून पिकावर होणारे किडींचे आक्रमण, कापसाला नसलेला हमीभाव, लागणारा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
 
अशातच मागील खरीप हंगामात बोंड अळीचा कापसावर प्रादुर्भाव झाला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चांगले उत्पन्न येईल, या आशेने शेतकऱ्यांनी निंदणीपासून ते फवारणीपर्यंत खर्च केला. मात्र, यानंतरही बोंड अळीने एकरच्या एकर पीक फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरविला.
यंदाही कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होईल, अशी शक्‍यता कृषी अभ्यासक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे पेरणीक्षेत्र घटण्याची शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. 
 
मागील खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा या क्षेत्रात तब्बल ७५ हजार ते एक लाख हेक्‍टरने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीक्षेत्र चार लाख हेक्‍टरवर येण्याची शक्‍यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारी (ता. पाच) राज्य खरीप आढावा बैठकीतही तसा अहवाल जिल्ह्यातर्फे मांडण्यात येणार आहे. 
 
बोंड अळीपासून कापसाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कामगंध सापळे (फेरोमन ट्रप) लावावेत. प्रतिहेक्‍टरी २० या प्रमाणात कामगंध सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात यंदा चार ते सव्वाचार लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी साधारणतः १७ लाख बियाणे पाकिटे लागणार आहेत. पेरणीसाठी बियाणे उपलब्ध आहेत. बियाण्यांची अडचण जाणार नसल्याचेही कृषी विभागाने स्षष्ट केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...