agriculture news in Marathi, Cotton price increased in domestic market will affect export, Maharashtra | Agrowon

देशांतर्गत कापूस दरवाढीचा निर्यातीला फटका
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

देशांतर्गत कापसाचे दर वाढल्याने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत कापूस किमतीत फरक निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना निर्यातीचे करार पूर्ण करण्यास किंवा नवीन व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. आॅक्टोबरमध्ये झालेले अनेक करार आता रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. 
- अतुल गनात्रा, अध्यक्ष, काॅटन असोशिएशन आॅफ इंडिया.

मुंबई ः देशात सुरवातीला बंपर कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि काही भागांतील दुष्काळसदृश स्थितीमुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर वाढले आणि त्यातच आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया मजबूत झाल्याचा फटका कापूस निर्यातीला बसणार आहे.

या दोन्ही कारणांमुळे पुढील दोन महिन्यांत ५ लाख गाठी (एक गाठ = १७० किलो) कापूस निर्यातीचे करार रद्द होऊ शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘देशांतर्गत कापसाचे दर वाढल्याने कापूस महाग झाला आहे. त्यातच रुपया मजबूत झाल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होणार आहे. करार झाले त्याच किमतीला कापूस निर्यात परवडणारी नाही. सध्या १० लाख गाठींच्या दरासाठी पुन्हा वाटाघाटी सुरू आहे आणि त्यातील निम्मे म्हणजेच ५ लाख गाठींचे करार रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.’’ मल्टिकमोडिटी एक्सचेंज आॅफ इंडियानुसार, मागील सहा ते सात आठवड्यांत कापसाचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये निर्यातीवर परिणाम झाला आहे.

निर्यात करारावर परिणाम
मुंबई येथील एका व्यापारी म्हणाला, ‘‘या हंगामातील कापूस आवक सुरू होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी कापूस निर्यातीसाठी ७३ ते ७७ सेंट्सप्रमाणे आगाऊ करार केले होते, त्यांना आता कापसाचे दर ८२ ते ८३ सेंट्सवर गेल्याने आपल्या कराराप्रमाणे कापूस निर्यात करणे अवघड झाले आहे.’’ आणखी एक व्यापाऱ्याने सांगितले, ‘‘आॅक्टोबरच्या सुरवातीपासून भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ६४ रुपयांवर डॉलरचे मूल्य आले आहे. आॅक्टोबरपासून २२ ते २५ लाख गाठींच्या व्यवहाराचे करार झाले आहेत आणि त्यापैकी जवळपास १३ लाख गाठींची निर्यातसुद्धा केली आहे.’’

निर्यात कमी होणार
देशांतर्गत बाजारात दर वाढल्याने सरकारने २०१७-१८ मध्ये निर्यात कमी होऊन ६७ लाख गाठी निर्यातीचे लक्ष ठेवले आहे. भारतीय कापूस महामंडळाने आधीच्या ६३ लाख गाठी निर्यातीच्या अंदाजात १३ टक्के घट करून ५५ लाख गाठी निर्यात होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. भारतीय कापसाचे बांगलादेश, व्हिएतनाम, चीन आणि टर्की हे मुख्य आयातदार देश आहेत.
 

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...