गुजरातेत ४७०० पर्यंत दर; खेडा खरेदीला पुन्हा वेग

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
जळगाव ः जिल्ह्यात कापूस उत्पादनात घटीचे संकेत मिळताच दरात थोडी सुधारणा झाली असून चोपडा, जळगाव, धरणगाव भागात क्विंटलमागे १५० रुपये सुधारणा झाल्याची माहिती आहे. सध्या दर ४४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. 
 
काही भागांत पहिल्या तीन वेचणीच्या कापसाला ४४५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर आहेत, तर कमी दर्जाच्या कापसाला क्विंटलमागे ४२०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर असल्याची माहिती आहे.
 
महिनाभरापासून कापसाचे दर दबावात आहेत. त्यातच सध्या जिनिंग व इतर खासगी खरेदीदारांना हवा तेवढा कापूस मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच गुजरातमधील कडी येथे कापसाचे दर स्थिरावले असून, ते ४७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहे.
 
खानदेशात गुजरातमधील जिनिंग व्यावसायिक मध्यस्थांकडून कापूस खरेदी करून घेतात. जिनिंगना निम्मेच कापूस प्रक्रियेसाठी रोज उपलब्ध होत आहे. त्या निम्मेच क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे कापसाचा दर्जा लक्षात घेऊन अधिक दर खरेदीदार देत असल्याची माहिती मिळाली. 
 
शिरपूरलगत (जि. धुळे) मध्य प्रदेशातील सेंधवा येथेही दर स्थिर आहेत, परंतु तेथेही ४४५० पेक्षा अधिक दर नसल्याची माहिती मिळाली. शिरपूर, धुळे तालुक्‍यातील काही कापूस उत्पादक जादा दरांच्या अपेक्षेने सेंधवा येथे कापूस विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाली. 
सध्या कापसाला जसा दर्जा आहे, त्यानुसार दर दिले जात आहेत. किरकोळ सुधारणा झाली आहे, परंतु दर ४५०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमीच आहेत. मध्यंतरी तर ४२०० पर्यंत दर खाली आले होते. 
- नाना पाटील, शेतकरी, पींप्री खुर्द, ता. चाळीसगाव (जि.जळगाव)
 
कापूस दरात सुधारणा होत असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात हवी तशी तेजी नाही. देशात जादा उत्पादनाचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. कापूस पुढील काळात मुबलक प्रमाणात येऊ शकतो. 
- संदीप पाटील, लगत  व्यावसायिक, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com