agriculture news in Marathi, cotton procurement of marketing federation will start from today, Maharashtra | Agrowon

कापूस पणन महासंघाची आजपासून कापूसखरेदी
विनोद इंगोले
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

 पणन महासंघ पहिल्या टप्प्यात आजपासून (ता.२५ ) कापूसखरेदी करेल. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात सीसीआयची केंद्र सुरू होतील. पहिल्या टप्प्यात आम्ही किती केंद्र सुरू करावी, याविषयी चर्चा सुुरू आहे. सायंकाळी किंवा रात्री उशिरा यावर निर्णय झाल्यानंतर स्पष्ट भूमिका मांडता येईल. मात्र आमची ६० केंद्र सुरू करण्याची तयारी पूर्णत्वास गेली आहे. 
- उषाताई शिंदे, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ

नागपूर ः राज्यात २५ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर कापूसखरेदी सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मात्र सीसीआय आणि पणन महासंघाची किती केंद्र असतील यावर मंगळवार (ता.२४) दुपारपर्यंत सहमती झाली नसल्याने याविषयी बोलण्यास पणन महासंघाकडून असमर्थता व्यक्‍त करण्यात आली. 

राज्यात या वर्षी ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जाणार आहे. एेनवेळी शेतकऱ्यांना बोनस किंवा वाढीव रक्‍कम द्यावयाची झाल्यास ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकरी शोधणे सोपी होणार असल्याने हा पर्याय निवडण्यात आल्याचे सूत्र सांगतात. पहिल्या टप्प्यात पणन महासंघ सुमारे ६० केंद्रे सुरू करेल; तर सीसीआयची नोव्हेंबर महिन्यात ७५ केंद्रे राहतील. 

परतीच्या पावसाने बोंड भिजली परिणामी ओलाच कापूस बाजारात येण्याच्या शक्‍यतेने सीसीआय आपली केंद्र नोव्हेंबरमध्ये उघडणार आहे. मात्र राज्य सरकारवर कापूस उत्पादकांचा दबाव वाढल्याने सरकारने हस्तक्षेप करीत पणन महासंघाला केंद्र उघडण्यास सांगितले. त्यानुसार २५ ऑक्‍टोंबरपासून पणनची खरेदी होईल. मात्र मंगळवारी (ता.२४) दुपारपर्यंतच्या बैठकीत केंद्रसंख्येबाबत सहमती झाली नाही. 

इतर अॅग्रो विशेष
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक...सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या...
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
करडई पीक सल्लागेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...