agriculture news in Marathi, cotton procurement start in cotton marketing federation centers, Maharashtra | Agrowon

राज्यात ३६ केंद्रांवर कापूस खरेदीस प्रारंभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पहिल्या दिवशी ६० केंद्रांचे नियोजन होते; परंतु तांत्रिक कारणामुळे ३६ केंद्रांवर काटापूजन झाले. उर्वरित केंद्रे गुरुवारी (ता. २६) सुरू होतील. पहिल्या दिवशी किती कापूस संकलन झाले याविषयीचे आकडे रात्री उशिरा मिळतील. 
- उषाताई शिंदे, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ

नागपूर ः राज्यात पणनच्या कापूस खरेदीचा मुहूर्तालाच बोजवारा उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या दिवशी एक क्‍विंटल कापसाची खरेदी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगीतले.

त्यासोबतच ६० पैकी केवळ ३६ केंद्रेच बुधवारी (ता.२५) कशीबशी सुरू झाली. त्यावरूनच खरेदीत सुसूत्रता नसल्याचे सिद्ध झाले आहे.
 सध्या कापसाची खरेदी खासगी व्यापारी ३४०० ते ३६०० रुपये प्रतिक्‍विंटलने करीत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादकांना संरक्षण देण्याकरिता ‘सीसीआय’चा एजंट म्हणून पणन महासंघाने बुधवारपासून (ता.२५) खरेदी सुरू केली. या वेळी ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस घेतला जाणार आहे. त्यामुळे खरेदीच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद खरेदीला मिळाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात पहिल्याच दिवशी ६० खरेदी केंद्रे उघडण्यात येणार होती; परंतु नियोजनाअभावी पहिल्या दिवशी केवळ ३६ केंद्रेच सुुरू झाली आहेत. उर्वरित केंद्र आज (ता.२६) उघडण्यात येतील, असे पणनच्या सूत्रांनी सांगितले. कापूस खरेदीचा अशा प्रकारे पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला असून, त्यातच ऑनलाइनची सक्‍ती करण्यात आल्याने गोंधळात आणखीच भर पडली आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...