agriculture news in Marathi, cotton procurement start from today, Maharashtra | Agrowon

कापूस खरेदीला आजपासून प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

नागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून (ता.१७) प्रारंभ होत आहे. महाकॉट-ई-प्रो सॉफ्टवेअरद्वारे सात दिवसांच्या आत कापूस चुकाऱ्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. 

नागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून (ता.१७) प्रारंभ होत आहे. महाकॉट-ई-प्रो सॉफ्टवेअरद्वारे सात दिवसांच्या आत कापूस चुकाऱ्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खरेदीची सुरवात होणार आहे. या हंगामाकरिता ६० तालुक्यांत ६० कापूस केंद्रावर खरेदी करण्यात येईल. महाकॉट-ई-प्रो सॉफ्टवेअरद्वारे चुकाऱ्याशीवाय कापूस खरेदीची कार्यवाही संगणकीय आधारावर करण्यात येणार आहे. विक्री करतेवेळी अद्ययावत सातबारा व आधारकार्ड असणे आवश्यक आहे. पहिल्या वेळी ही कागदपत्रे आणल्यानंतर पुढील वेळेस कापूस विक्रीस आणतांना कोणतीही कागदपत्रे आणावी लागणार नाही. पणन महासंघाची नियुक्ती ‘सीसीआय’चे अभिकर्ता म्हणून झाली आहे.

कापूस विक्रीस आणताना...
केंद्रावर ८ ते १२ टक्के पर्यंतचाच ओलावा असलेला कापूस स्वीकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेला कापूस हा काडी कचरा विरहीत आणावा. विक्री केलेल्या कापसाचे चुकारे थेट बॅंक खात्यात बिनचूक जमा व्हावे, याकरिता ज्या बॅंकेशी आधारकार्ड लिंक आहे, अशा बॅंक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधारकार्ड व सातबारा उतारा, अद्ययावत पिकऱ्याच्या नोंदीवर नमूद केलेली कागदपत्रे आणवी, असे आवाहन राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...