agriculture news in Marathi, cotton procurement started on 121 centers in state, Maharashtra | Agrowon

राज्यात १२१ केंद्रांवर कापूस खरेदीस प्रारंभ ः देशमुख
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्यात कापूस हंगाम २०१७-२०१८ मध्ये कापसाचे दर हमीभावाच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यात कापूस हमीभावाने खरेदीसाठी केंद्र शासनाचे नोडल एजंट ‘सीसीआय’ आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघ यांची १२१ कापूस खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. २५) दिली.

मुंबई : राज्यात कापूस हंगाम २०१७-२०१८ मध्ये कापसाचे दर हमीभावाच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यात कापूस हमीभावाने खरेदीसाठी केंद्र शासनाचे नोडल एजंट ‘सीसीआय’ आणि महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघ यांची १२१ कापूस खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी (ता. २५) दिली.

कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी महासंघ, नाफेड, पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना कापूस विक्रीस आणताना प्रत्येकवेळी सातबारा उतारा, आधार कार्ड व इतर कागदपत्रे आणण्याचा त्रास होऊ नये. तसेच चुकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर १८ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू केली आहे.

राज्यात कापूस पणन महासंघाव्दारे ६० केंद्रे व केंद्र शासनाचे नोडल एजंट सीसीआयव्दारे ६१ अशा १२१ केंद्रांवर हमी दरावर कापूस खरेदी करण्यात येणार आहे. ‍बुधवार (ता. २५) पासून महासंघाव्दारे ३९ कापूस खरेदी केंद्रांवर खरेदीला सुरवात करण्यात आलेली असून, उर्वरित २१ केंद्रांवर २६ ऑक्टोबरनंतर सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी आणि एफएक्यू प्रतीचा कापूस महासंघाकडे हमी दरावर विक्रीसाठी आणावा. तसेच याबाबत काही अडचण असल्यास त्याची तक्रार कापूस पणन महासंघाच्या विभागीय व्यवस्थापकांकडे करावी, असे आवाहनही मंत्री देशमुख यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...