परभणी, हिंगोलीत सात लाख क्विंटल कापूस खरेदी

कापूस खरेदी
कापूस खरेदी

परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाच्या परभणी विभागाअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १६) पणन महासंघ, सीसीआय, खासगी व्यापाऱ्यांची मिळून एकूण ७ लाख ९ हजार ७३४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात परभणी आणि ताडकळस येथे पणन महासंघाची केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत या केंद्रांवर कापूस खरेदी झालेली नाही. हमीभावानुसार सीसीआयतर्फे सेलू येथे १३ हजार ७११, मानवत येथे ४ हजार ९६५, जिंतूर येथे ४५८ क्विंटल अशी एकूण १९ हजार १३४ क्विंटल कापूस खरेदी झाली.

सीसाआयकडून चालू बाजारभावानुसार ताडकळस येथे १६५१, सेलू येथे १०,२८९, मानवत येथे १०,२८९, जिंतूर येथे २०३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. खासगी व्यापाऱ्यांकडून परभणी येथे ५५,९२१, ताडकळस येथे ७९४३, सेलू येथे २ लाख ४८ हजार ५८८, मानवत येथे १ लाख ७६ हजार ३८१, पाथरी येथे ३१,३३२, जिंतूर येथे ७४,५७७, बोरी येथे ६८३६, गंगाखेड येथे ३५,८०९, सोनपेठ येथे ३८ हजार ७४, पूर्णा येथे ६३९ क्विंटल अशी एकूण ६ लाख ३१ हजार ६६३ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. सीसीआय आणि खासगी मिळून एकूण ६ लाख ७६ हजार १०० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि हयातनगर येथे पणन महासंघाचे खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले. त्यापैकी हिंगोली येथील केंद्रावर १० शेतकऱ्यांच्या ११९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात सीसीआयतर्फे हमीभावाने जवळा बाजार येथे १४७० क्विंटल तसेच चालू बाजारभावानुसार ५४० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.

खासगी व्यापाऱ्यांकड़ून हिंगोली येथे १८,३६८, हयातनगर येथे २२४६, जवळाबाजार येथे ३६००, आखाडा बाळापूर येथे ९४२० क्विंटल अशी एकूण ३१ हजार ५०५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. पणन महासंघ, सीसीआय, खासगी मिळून एकूण ३३ हजार ६३४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांत एकूण ७ लाख ९ हजार ७३४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. आजवर खुल्या बाजारात ४३२० ते ५४०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com