agriculture news in marathi, cotton producer state consider bonus to farmer, Maharashtra | Agrowon

कापसाला बोनस देण्याचा विचार
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

कापूस हंगाम पूर्णपणे सुरू झाल्यास चांगल्या उत्पादनाची शक्यता असल्याने बाजारात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात घसरण होऊन हमीभावाच्या खाली व्यवहार होण्याची शक्यता आहे.
- अरुण शेखसारिया, संचालक, डीडी कॉटन, मुंबई

मुंबई  ः देशातील महत्त्वाची कापूस उत्पादक महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश ही राज्ये शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या विचारात आहेत. शेतकऱ्यांना हमीभावावर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरवातीला होण्याची शक्यता आहे, अशी माहिती या निर्णय प्रक्रियेत सहभागी असलेल्या सूत्रांनी दिली. 

देशात कापूस उत्पादनात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यांचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे या चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. यातील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यामुळे कापसाला बोनस देण्याचा निर्णय राजकीय फायद्यासाठीच घेतला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

केंद्र सरकारने यंदा कापसाच्या हमीभावात १ हजार १३० रुपयांची वाढ केली आहे. मध्यम लांब धाग्याच्या कापसाला ५१५० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे. तर लांब धाग्यासाठी ५४५० रुपये हमीभाव आहे. ५०० रुपये बोनस धरल्यास या राज्यांतील शेतकऱ्यांना अनुक्रमे ५६५० रुपये आणि ५९५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळेल.
  
‘‘महाराष्ट्रात सुरवातीच्या काळात गुलाबी बोंड अळीचा वाढलेला प्रादुर्भाव आता काहीसा नियंत्रणात आला आहे. त्यामुळे यंदा राज्यात उत्पादन बऱ्यापैकी येऊन गुणवत्ताही चांगली राहण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. नवीन हंगामापासून बाजारात येण्यास उशीर होऊन यंदा नोव्हेंबरपासूनच कापूस बाजारात येईल. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढेल. 
 

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...