agriculture news in marathi, cotton production in china, America to increase next season | Agrowon

चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील हंगामात वाढणार?
चंद्रकांत जाधव
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख कापूस गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ही आवक जवळपास ३० लाख गाठींनी कमी आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चीन व अमेरिकेत पुढील हंगामात कापसाचे उत्पादन २०-२० टक्‍क्‍यांनी वाढेल, अशी माहिती विविध संस्थांनी दिल्याने न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर नीचांकी पातळीवर म्हणजेच ७० सेंटवर आले आहेत. 

जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख कापूस गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ही आवक जवळपास ३० लाख गाठींनी कमी आहे. याच वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात चीन व अमेरिकेत पुढील हंगामात कापसाचे उत्पादन २०-२० टक्‍क्‍यांनी वाढेल, अशी माहिती विविध संस्थांनी दिल्याने न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर नीचांकी पातळीवर म्हणजेच ७० सेंटवर आले आहेत. 

देशात उत्पादन घटल्याचे समोर येत आहे. परंतु निर्यातीसंबंधी फारशी सकारात्मक स्थिती नाही. ३१ जानेवारी २०१९ अखेरपर्यंत देशांतर्गत बाजारात १८० लाख गाठींचा पुरवठा झाला आहे. अर्थातच ४० टक्के कापूस बाजारात अजून आलेला नाही. ही आकडेवारी लक्षात घेता देशात ३३० ते ३३५ लाख गाठींचे उत्पादन निश्‍चित मानले जात आहे. सरकी तेलाचे दर बऱ्यापैकी असल्याने सरकीला उठाव कायम असून, मागील आठवड्यात सरकीचे दर प्रतिक्विंटल ५० रुपयांनी वधारून २३०० रुपयांपर्यंत आहेत. कापसाचा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या अमेरिकेत या हंगामात सुमारे २३८ लाख गाठींचे उत्पादन हाती आले असून, तेथे हंगाम संपला आहे. तर चीनमध्ये ३४५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. पुढील हंगामात म्हणजेच सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०१० मध्ये चीन आणि अमेरिकेतील कापूस उत्पादन अनुक्रमे २०-२० टक्‍क्‍यांनी वाढेल आणि हवी तशी मागणी राहणार नाही, असे अहवाल आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थांनी प्रसिद्ध केले आहेत. परिणामी न्यूयॉर्क वायदामध्ये कापूस दर नीचांकी पातळीवर पोचले. मागील पाच दिवसात दर ७४ सेंटवरून ७० सेंटवर आले आहेत. भारतीय खंडीला (३५६ किलो रुई) ४२०० हजार रुपयांपर्यंत कमाल दर आहे. 

निर्यातही रखडत
मागील हंगामात जानेवारीअखेर सुमारे ३७ लाख गाठींची भारतातून परदेशांत निर्यात झाली होती. या हंगामात सुमारे २५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. चीन व अमेरिकेत व्यापार युद्ध संपुष्टात आल्यासंबंधीची अधिकृत घोषणा अजूनही झालेली नसल्याने निर्यात रखडत सुरू असल्याची माहिती मिळाली. 

चीनची गरज कमी
व्यापार युद्धामुळे कापसाचा सर्वांत मोठा आयातदार असलेल्या चीनची कापसाची गरज सुमारे २५ ते ३० टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे. चीनमध्ये मागील तीन हंगामात सरासरी ३५० लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. चीनला प्रत्येक हंगामात सुमारे ५५० ते ६०० लाख गाठींची गरज असते. चीनचा वस्त्रोद्योग जगात सर्वांत मोठा असून, सात हजार कोटी किलोग्रॅमपेक्षा अधिक सुताचे उत्पादन चीन करतो. त्यासाठी चीन भारत, चीनमधून सूत, रुईची आयात करतो. परंतु व्यापार युद्ध व इतर कारणांमुळे चीनमधील वस्त्रोद्योगाला फटका बसला आहे. परिणामी भारतासह अमेरिकेतील कापूस निर्यात रखडत सुरू आहे, अशी माहिती जाणकारांनी दिली. 

प्रतिक्रिया...
पुढील हंगामात चीनसह अमेरिकेचे उत्पादन वाढेल, अशी 
माहिती जागतिक कापूस बाजारात वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यात चीन - अमेरिकेतील व्यापार युद्धाचा फटका जगभरातील वस्त्रोद्योगाला बसत आहे. देशात कापूस उत्पादन कमी असले तरी अजून ४० टक्के कापूस बाजारात आलेला नाही. परिणामी वायदा बाजारात सध्याचे दर दबावात दिसत आहेत.
- अरविंद जैन, माजी अध्यक्ष, 
खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

इतर अॅग्रोमनी
मका, हळद, गव्हाच्या किमतीत तेजीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढअमेरिकेने चीनकडून होणाऱ्या आयातीवर वाढविलेल्या...
नेहे कुटुंबीयांनी कांदा पिकावर बसवले...नगर जिल्ह्यातील सावरगाव तळ (ता. संगमनेर) हे डोंगर...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
रब्बी हंगामातील आवकेचा दरावर परिणाम या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू,...
सुताचे दर वाढले जळगाव ः देशांतर्गत सूतगिरण्यांसमोर कापूस...
मका, हळद, कापसाचा तेजीकडे कलबाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या...
रुपयाचे अवमूल्यन, सरकीतील तेजीने कापूस...पुणे ः सध्या कापसाचे दर बाजारात ६५००...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
नियोजन, काटेकोर अंमलबजावणीतून साधला...शेतीतील वाढता खर्च ही शेतकऱ्यांसमोरची मुख्य...
हळद, मका, कापूस मागणीत वाढीचा कलएप्रिल महिन्यात हळदीची मागणी वाढत आहे. त्यामुळे...
पुढील हंगाम ७० लाख टन साखरेसह सुरू होणारकोल्हापूर : साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे...
कौशल्य विकासातून संपत्तीनिर्माणशेती-उद्योगात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण ...
मिरज बाजारात जनावरांचे दर घटले सांगली ः चारा महागलाय, पाणी नाय, केवळ...
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी लिंबाचा आधारउन्हाळ्यात लिंबाला मोठी मागणी असते. यंदाच्या...
कापूस, मक्याच्या मागणीत वाढ सध्या बाजारपेठेत मका, हळदीच्या मागणीत वाढ आहे....
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...