agriculture news in Marathi, Cotton production decreased in India and China, Maharashtra | Agrowon

चीनसह भारतात कापूस उत्पादन घटले
चंद्रकांत जाधव
रविवार, 15 एप्रिल 2018

चीनमधून सुतासह रुईला मागणी आहे. आगामी काळात ही मागणी स्थिर राहील. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे अमेरिका भारतासह इतर आशियाई देशांना कमी मार्जीनवर रुई पुरवठा करू शकतो. सध्या रुईसह सुताचे दर स्थिर आहेत.
- अरविंद जैन, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

जळगाव ः जगातिक प्रमुख कापूस उत्पादक देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतासह चीनचे कापूस उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी अपेक्षेपेक्षा कमी आले असून, अमेरिका मात्र उत्पादनात पुढे जात आहे. यंदा तेथे सुमारे १० लाख गाठींनी उत्पादन वाढणार असल्याची माहिती आहे. यातच अमेरिका व चीनमधील व्यापार युद्धाचा लाभ भारतीय सूत उत्पादकांना होत असून, सुताचे दर स्थिरावले आहेत. कापूस बाजारही ८३ सेंटवर स्थिर आहे. अमेरिकेत सुमारे ५० लाख गाठींनी उत्पादन वाढल्याची माहिती बाजारपेठेतील जाणकार, विश्लेषकांकडून     मिळाली.

 अमेरिकेने चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आणखी १०० बिलियन डॉलर आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तर चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लागू केले असून, हे व्यापार युद्ध भारतीय सूत उत्पादकांच्या लाभाचे ठरत आहे. भारतात यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्र सुमारे नऊ लाख हेक्टरने वाढले होते. तरीही उत्पादन मागील वर्षाएवढेच आले आहे.

तर चीनमध्ये क्षेत्र सुमारे ४१ लाख हेक्टर होते. तेथेही अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन आले अाहे. यात अमेरिने मात्र सुमारे ५० लाख गाठींचे अधिक उत्पादन घेण्याची किमया यंदा साधली आहे. त्यात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुताचे दर सुधारले असून, चांगल्या दर्जाचे सूत २०० रुपये किलोवर आहे.

 जागतिक कापूस बाजारात रुईसह सुताची आयात सुरू असून, चीन व अमेरिकेतील व्यापार युद्धीने या दोन्ही देशांचा कमोडिटी बाजार अडीच टक्क्यांनी घसरला आहे. जागतिक कापूस उत्पादनात वाढ दिसत असली तरी प्रमुख कापूस उत्पादक देशांमध्ये स्थिती समाधानकारक नसल्याने कापूस बाजारात आयातीच्या हालचाली वाढत आहेत. चीनमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ४४ लाख गाठींनी उत्पादन वाढणार असले तरी आपल्याकडील कापड उद्योगाला हवे तेवढे सूत चीन पुरवठा करू शकत नाही.

चीनला किमान ५०० लाख गाठींची गरज आहे. पण गाठींपासून सूत तयार करण्यासंबंधीचा मजूर व इतर खर्च वाढल्याने चीनने सूत आयात वाढविली असून, बांगलादेशसह भारतीय सुताला मागणी आहे. सुमारे १५० मेट्रिक टन सूत आयातीसंबंधीचे सौदे चीनने आशियायी देशांमध्ये केले असून, यातील ३० टक्के सूत भारतातून तेथे निर्यात होण्याचे संकेत जाणकारांनी दिले आहेत. 
तसेच आगामी काळातील बाजारातील अस्थिरता लक्षात घेता चीन संरक्षित (बफर स्टॉक) करण्याच्या हालचाली सुरू करत आहे. यामुळे चीनमध्ये कार्यरत काही बहुराष्ट्रीय संस्थांनी रुईची आयात वाढविली आहे. 

प्रतिक्रिया
सुताचे दर स्थिर आहेत. किंचित सुधारणा सुताच्या दरात दिसत आहे. चीनमध्ये कापसाचे उत्पादन मागील वर्षापेक्षा अधिक दिसत असले तरी ते २०१३-१४ च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटले आहे. 
- राजाराम पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, लोणखेडा, (ता. शहादा, जि. नंदुरबार)

प्रमुख देशांमधील गाठींचे उत्पादन (एक गाठ १७० किलो रुई)

देश    २०१३-१४ २०१४-१५  २०१५-१६   २०१६-१७
भारत ३९८  ३८०  ३४५  ३६२
चीन   ४०७ ३८१  ३०३ ३५०
अमेरिका   १६५   २०९  १६४   २३०
पाकिस्तान   १२२    १३५    ८९   ९३

        
             
             
        
   

 

 

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...