Agriculture News in Marathi, cotton production down, Sillode taluka, Aurangabad district | Agrowon

सिल्लाेड तालुक्यात कपाशी उत्पादनात घटीचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017
सिल्लोड, जि. औरंगाबाद : कापसाच्या उत्पादनात अग्रसेर असलेल्या सिल्लोड तालुक्‍यात यंदा मात्र कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
 
सिल्लोड तालुक्‍यात यंदा ९८ हजार हेक्‍टर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ४३ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. पावसाने दिलेला ताण त्याचबरोबर किडींचा मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रादुर्भावामुळे याचा फटका कापसाच्या उत्पन्नास बसला आहे. 
 
सिल्लोड, जि. औरंगाबाद : कापसाच्या उत्पादनात अग्रसेर असलेल्या सिल्लोड तालुक्‍यात यंदा मात्र कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
 
सिल्लोड तालुक्‍यात यंदा ९८ हजार हेक्‍टर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ४३ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. पावसाने दिलेला ताण त्याचबरोबर किडींचा मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रादुर्भावामुळे याचा फटका कापसाच्या उत्पन्नास बसला आहे. 
 
बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कापसाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध कपाशींचे वाण बाजारात आणले खरे मात्र, यापासून शेतकऱ्यांच्या पदरात पडणारे उत्पन्न, त्यावर झालेला खर्च याचा विचार केल्यास एकरी वीस क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पन्न घेणारा शेतकरी यंदा पदरात एकरी सात ते आठ क्विंटल उत्पन्नसुद्धा मिळणार की नाही, या आशेने हैराण आहे. 
 
महागडी खते, औषधांची फवारणी केल्यानंतरही पदरी पडणाऱ्या कमी उत्पादनाचा विचार पाहता, शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा होत असल्याची चिन्हे आहेत. त्यातच पावसाने कापूस ओला झाल्याचे कारण पुढे करित व्यापारीदेखील पडेल भावामध्ये कापसाची खरेदी करीत आहेत. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना परत सावकाराच्या दारातच उभे रहावे लागणार आहे.
 
तालुक्‍यात खासगी जिनिंगचे बस्तान मोठ्या प्रमाणात आहे. याचा फायदा योग्य बाजारभाव मिळण्यासाठी होणे गरजेचे असताना दलालांच्या माध्यमातूनच जिनिंगवर कापूस नेल्या वाचून पर्याय नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनच विक्री होत असल्याने या साखळीमध्ये केवळ शेतकऱ्यांचेच मरण होत आहे.
 
खरीप हंगामाच्या पेरणीनंतर शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी; तसेच भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे असताना या विभागाच्या वतीने केवळ सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रकार बघावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे अाहे. कार्यालयातच अहवाल तयार करण्याचा होत असलेला कारभार शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत आहे.
 
दरवर्षी एकरी पंधरा ते वीस क्विंटल कापसाचे उत्पन्न निघत होते. या वर्षी मात्र कापसाच्या उत्पन्नावर परिणाम होणार असून, केवळ दोन वेचणीतच कापसाचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. याचा विचार केल्यास केवळ एकरी सात क्विंटलपर्यंतच उत्पन्न पदरात पडणार आहे.
- देविदास लोखंडे, शेतकरी, मांडना ता. सिल्लोड

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...