कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणार

कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणार
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणार

मुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विपरीत स्थिती असल्याने कापूस उत्पादनात घट येणार आहे. भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) दोन महिन्यांत तब्बल दोन वेळा उत्पादनाच्या अंदाजात घट करून ३४० लाख गाठी (एक गाठ ः १७० किलो) उत्पादन होणार असल्याचे जाहीर केले. यंदा देशातील अनेक कापूस उत्पादक भागांमध्ये कमी पाऊस झल्याने त्याचा परिणाम उत्पानदनावर झाला आहे. त्यामुळे ‘सीसीआय’ने मागील दोन महिन्यांत तब्बल दोन वेळा देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात बदल करत नवीन अंदाज जाहीर केला आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या देशातील कापूस उत्पादनात मोठा वाटा असतो. या तीनही राज्यांमध्ये कापूस उत्पानदन घटणार असल्याचा अंदाज ‘सीसीआय’ने व्यक्त केला आहे.  देशातील कापूस वापर ३२४ लाख गाठी होईल आणि आयात २७ लाख गाठींपर्यंत जाईल, असेही ‘सीसीआय’ने म्हटले आहे. तसेच शिलकी साठ्यातही घट होऊन साठा १३ लाख गाठी राहील. मध्य भारातात, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात यंदा १८८ लाख गाठी उत्पादन होईल, आॅक्टोबरमध्ये १९२ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता.  गुजरात आणि महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने मध्य भारतात उत्पादन घटेल असे ‘सीसीआय’ने म्हटले आहे. तर उत्तर भारतातील पंजाब, हरियाना आणि राजस्थान या भागात कापूस उत्पादन ६० लाख गाठी होईल. दक्षिण भारातात ८८ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे.   गुजरात, महाराष्ट्रात उत्पादनात मोठी घट ‘सीसीआय’ने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार गुजरातमध्ये कापूस उत्पादनात तीन लाख गाठी उत्पादनची घट होणार आहे. तर महाराष्ट्रात एक लाख आणि तेलंगणात दीड लाख गाठींची घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात देशात उत्पादित होणाऱ्या एकूण कापसापैकी ५५ टक्के कापूसाचे उत्पादन होते. आॅक्टोबर महिन्यात ‘सीसीआय’ने ३४३ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता. तसेच ५३ लाख गाठी निर्यात होतील असेही नमुदकेले होते. मात्र निर्यातीतही घट होऊन ५१ लाख गाठी निर्यात होतील, असे जाहीर केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com