कापूस उत्पादन अकरा टक्क्यांनी वाढणार

कापूस उत्पादन
कापूस उत्पादन

मुंबई ः पीक क्षेत्र वाढल्याने यंदाच्या हंगामात देशातील कापूस उत्पादन ११.३ टक्क्यांनी वाढून ते ३७५ लाख गाठींवर (एक गाठ १७० किलो) पोचेल, असा अंदाज कॉटन असोशिएशन अाॅफ इंडियाने (सीएअाय) व्यक्त केला अाहे.

गेल्या वर्षी ३३७.२५ लाख गाठी उत्पादन झाले होते. त्यात यंदा ३७.७५ लाख गाठींची वाढ होण्याची शक्यता अाहे. गेल्या हंगामात कापसाला चांगला दर मिळाला होता. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड केली. कापूस क्षेत्र १९ टक्क्यांनी वाढल्याने अधिक उत्पादन मिळणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत.

दरम्यान, गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले अाहे. यामुळे उत्पादकता कमी राहील, असेही ‘सीएअाय’ने नमूद केले अाहे.

यंदाच्या हंगामात देशात एकूण ४२२ लाख गाठी कापसाचा पुरवठा राहील. देशात १७ लाख गाठी कापसाची अावक राहणार अाहे. तर देशांतर्गत वापर ३२० लाख गाठी होणार अाहे. देशातून ६३ लाख गाठी कापसाची निर्यात अपेक्षित अाहे, असा अंदाज व्यक्त केला अाहे.

उत्तर भागात ५५ लाख गाठी उत्पादन होण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी या विभागात ४६ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. तर गुजरात, महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेश अादी राज्यांचा समावेश असलेल्या मध्यवर्ती भागातील कापूस उत्पादन २१२ लाख गाठींवर पोचेल. तेलंगणा, अांध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू अादी दक्षिणेकडील राज्यांत १०३ लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता अाहे, असे ‘सीएअाय’ने म्हटले अाहे.

अाॅक्टोबरअखेरपर्यंत १८ लाख गाठी कापूस अावक देशातील विविध उत्पादक राज्यांत ३१ अाॅक्टोबर २०१७ पर्यंत १८.७५ लाख गाठी कापसाची अावक झाली अाहे. उत्तर भागात ७.० लाख गाठी, मध्य भागात ८.४५ लाख गाठी, दक्षिणेकडील राज्यांत ३.२५ लाख गाठी कापसाची अावक झाली अाहे, अशी माहिती ‘सीएअाय’ने दिली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com