किडींमुळे कापूस उत्पादनात मोठी घट

अकोला ः रेडकाॅटन बगने असा विळखा घातला अाहे. (तिसऱ्या छायाचित्रात) बोंडामधून कवडीयुक्त कापूस निघत अाहे.
अकोला ः रेडकाॅटन बगने असा विळखा घातला अाहे. (तिसऱ्या छायाचित्रात) बोंडामधून कवडीयुक्त कापूस निघत अाहे.

अकोला ः या हंगामात कापसाला गेल्यावर्षीएवढाही दर सध्या मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत अालेले अाहेत. त्यातच कापूस हंगामाला सुरवात होताच कीड-रोगामुळे उत्पादकता अर्ध्यापेक्षाही घटल्याचे दुर्दैवी चित्र समोर येत अाहे. बोंडअळी, पावसाचा फटका अाणि अाता रेडबगच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी आडचणीत आले अाहेत.  या हंगामात सुरवातीपासून शेतकऱ्यांच्या अपेक्षा कपाशीकडून लागल्या होत्या. परंतु जसजसे दिवस पुढे गेले अाणि प्रत्यक्ष कापूस हंगामाला सुरवात झाली, त्या वेळी सोयाबीन, मूग, उडीद पिकांप्रमाणेच याही पिकाने दगा दिल्याचे समोर अाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील कपाशीच्या झाडांवर ५० ते ९० बोंड्या लागलेल्या पाहायला मिळतात. परंतु जेव्हा हे बोंड उमलते त्या वेळी किडलेला कापूस निघत अाहे. वेचाईचा दर शेतकऱ्यांना परडवणारा राहलेला नाही. मजूर एकतर रोजंदारीने किंवा किलोप्रमाणे वेचणीस जात अाहेत. या हंगामात सर्वांत चांगले पीक म्हणून अातापर्यंत कपाशीकडे बघितले जात होते. मागील संपूर्ण हंगामात पाच हजार ते ५७०० पर्यंत शेतकऱ्यांना भावसुद्धा भेटला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर कमी करीत कपाशीची लागवड वाढवली. सुरवातीच्या दोन महिन्यांत कपाशीचे पीक चांगले होते. परंतु दिवाळीपूर्वी अालेल्या संततधार पावसाने शेतांमधील कपाशीच्या बोंड्या कुजल्या. तत्पूर्वी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला होता. यानंतर अाता रेड कॉटन बगचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला अाहे. प्रत्येक शेतात व बोंडावर रेडकॉटन बग अालेली अाहे. ही कीड पिकाला फारशी बाधक नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र बोंडातील सरकीमधील तेल ही कीड फस्त करतात, असेही तज्ज्ञांचे म्हणणे अाहे. वेचणीही त्रासदायक किडीमुळे बोंडांमधील कापसात कवडी वाढली अाहे. या कापसाची वेचणी करताना मजुरांनाही त्रास होत अाहे. चांगला कापूस ६० ते ७० किलोपर्यंत वेचणारा मजूर अाता केवळ १५ ते २० किलोच कापूस दिवसभरात वेचणी करीत अाहे. वेचून घरी अाणलेला कापूस पुन्हा स्वच्छ करावा लागतो. एवढे करूनही व्यापारी कापसाची कमी भावात खरेदी करून लूट करीत आहेत. सध्या कापसाची ३८०० ते ४५०० दरम्यान खरेदी-विक्री होत अाहे.

प्रतिक्रिया मी यावर्षी सात जूनला दोन वेगवेगळ्या शेतांत पावणेपाच एकरांत कपाशीची लागवड अाहे केली अाहे. यातील दीड एकरात अातापर्यंत एक किलोही कापूस अाला नाही. तर तीन एकराच्या तुकड्यात तीन ते साडेतीन क्विंटल कापूस अाला अाहे. अाता या शेतात अाणखी कापूस येण्याची शक्यता दिसत नाही. बोंडअळी, कूज, रेडकॉटन बग याचा सर्वाधिक फटका बसला. नुकतीच दोनशे रुपये रोजंदारी देऊन कापूस वेचला तर मजुरांनी प्रत्येकी दहा किलो कापूस वेचला. म्हणजेच वेचलेला कापूस २० रुपये किलो पडला. एकराला अाजवर २५ हजार रुपये खर्च लागलेला अाहे. लागलेल्या खर्चाइतकेही उत्पादन झालेले नाही.  - मधुसूदन रामेश्वर भिसे, लाखोंडा खुर्द, जा. जि. अकोला   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com