अमरावतीत बोंडअळीमुळे कपाशीत ५१ टक्क्यांची घट

बोंडअळी
बोंडअळी

अमरावती ः या वर्षीच्या हंगामात जिल्ह्यात एक लाख ३ हजार ८०० हेक्‍टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे उत्पादनात ५१ टक्‍क्‍यांची घट झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यानंतर हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. बियाणे कंपन्यांकडून भरपाई व एनडीआरएफची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंडअळीने बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिले होते. त्यानंतर दोन दिवसांत अहवाल मागितला होता. मात्र प्राथमिक अहवालापेक्षा प्रत्यक्षात नुकसान जास्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाच डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व तुडतुड्यामुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याआधारेच पंचनामे करून प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला.  रुईची उत्पादकता होणार कमी बोंडअळीमुळे हेक्‍टरी ८४९ किलो रुईचे उत्पादन कमी होणार आहे. यामध्ये भातकुली तालुक्‍यात सर्वाधिक १,०५६ किलो, अमरावती ८४३, चांदूर रेल्वे ८३५, धामनगाव रेल्वे ७२२, नांदगाव खंडेश्‍वर ८४४, मोर्शी ८८१, वरुड ८१०, चांदूरबाजार ९४१, तिवसा ९३७, अचलपूर ९५०, अंजनगावसुर्जी ९२१, दर्यापूर ९१४, धारणी ४७२, चिखलदरा तालुक्‍यात ५२५ किलो रुईच्या उत्पादनात घट होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com