धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड क्विंटलच्या आतच

पूर्वहंगामी कपाशीवर गुलाबी बोंडअळी अधिक आहे. ती काढून फेकण्याशिवाय पर्याय नाही. धुळ्यातील कापूस उत्पादक उद्‌ध्वस्त झाला आहे. हेक्‍टरी ३० हजार रुपये भरपाई तातडीने द्यावी. - गयभू के. पाटील, शेतकरी, तरडी, (ता. शिरपूर, जि. जळगाव)
धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड क्विंटलच्या आतच
धुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन दीड क्विंटलच्या आतच

धुळे ः गुलाबी बोंडअळीचा उद्रेक, सिंचनासाठी पाण्याचा अभाव, कोरडवाहू कपाशीची अवस्था बिकट झाली असून, यंदा एकरी कापूस उत्पादन एक ते दीड क्विंटलपर्यंत आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांमागे अर्ज भरणे, ऑनलाईन माहिती देणे, अशी कटकट शासनाने न लावता थेट पिकांचे पंचनामे करावेत, पीक पाहणी कार्यक्रम हाती घेतला जावा, आणि हेक्‍टरी २५ ते ३० हजार रुपये सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  धुळे जिल्ह्यात खरिपाखालील क्षेत्रापैकी ५० टक्‍क्‍यांवर क्षेत्र कपाशीने व्यापले आहे. यंदा १०३ टक्के लागवड झाली. जवळपास दोन लाख हेक्‍टरवर कपाशी होती. शिंदखेडा, धुळे व शिरपूर तालुक्‍यात अधिक कपाशी होती. शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्‍यात पांझरा नदी, तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये पूर्वहंगामी कपाशीची लागवड अधिक झाली. शेतकऱ्यांनी ठिबक, बियाणे, तण नियंत्रण आदी कामांसाठी अधिक खर्च केला. कीडनाशकांवरचा खर्चही यंदा वाढला. यंदा पाऊस कमी व आर्द्रतायुक्त, ढगाळ वातवरण अनेक दिवस होते. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाहेर गावांमधून रिक्षा, ट्रॅक्‍टरने मजूर आणावे लागले. एवढा त्रास व खर्च सहन करूनही आता पिकाची अवस्था बिकट बनली आहे. केलेला खर्चही भरून निघणार नाही. त्यातच कवडी, किडका कापूस घ्यायला व्यापारी तयार नाहीत. कमी दर देवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करतात. दर्जा कमी असल्याचे सांगून कमी दर देतात. अशा सगळ्या समस्यांमध्ये कापूस उत्पादक सापडले असताना शासनाकडून आता कोणतेही उपाय केले जात नसल्याचे चित्र आहे. नुकसान भरपाईबाबत तातडीने कार्यवाही हाती घेणे गरजेचे आहे. कर्जमाफी प्रक्रियेचे जसे गाजर दाखविले, गोंधळ घातला तसा गोंधळ आता कपाशी नुकसानग्रस्तांबाबत घालू नका, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.  प्रतिक्रिया कोरडवाहू कपाशीचे उत्पादन एकरी एक क्विंटलही आलेले नाही. अशा स्थितीत शासनाने तातडीने मदत द्यायला हवी. कपाशीचे दरही कमी अधिक असेच दिले जात आहेत.  - आत्माराम बळिराम पाटील, शेतकरी, कापडणे (ता. धुळे) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com