agriculture news in Marathi, Cotton production will decreased by 25 lack bales in Maharashtra and Telangana, Maharashtra | Agrowon

महाराष्ट्र आणि तलंगणात कापूस उत्पादन २५ लाख गाठींनी घटणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

मुंबई ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे कापूस सल्लागार मंडळाने ठेवलेल्या ३७७ लाख गाठी उत्पादन उद्दिष्टात ७ ते ८ टक्के म्हणजेच २५ टक्के घट होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मुंबई ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे कापूस सल्लागार मंडळाने ठेवलेल्या ३७७ लाख गाठी उत्पादन उद्दिष्टात ७ ते ८ टक्के म्हणजेच २५ टक्के घट होणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

 आधी कापूस सल्लागार मंडळाने देशात मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन ९ टक्क्यांनी वाढून ३७७ लाख गाठी होईल, असे जाहीर केले होते, तर दुसरीकडे भारतीय कापूस महामंडळाने उत्पादन ११ टक्क्यांनी वाढून ३७५ लाख गाठी होईल, असा अंदाज जाहीर केला होता. मात्र महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांमध्ये बोंड अळीने तब्बल २५ लाख गाठी उत्पादन आपल्या घशात घातले त्यामुळे देशातील कापूस उत्पादन ३५५ लाख गाठींपर्यंत होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले.  

‘‘महाराष्ट्रातील कापूस नुकसानाचा अंदाज बांधणे सध्या अवघड आहे, परंतु राज्यात जवळपास १५ लाख गाठी कापसाचे बोंड अळीमुळे नुकसान झाले असे वाटते,’’ असे विपणन महामंडळाचे व्यवस्थापक (खरेदी) जयेश महाजन यांनी सांगितले. 
दरम्यान, जिनिंग उद्योगाला आतापासूनच कापसाची टंचाई भासत आहे, तर दरही वाढले आहेत. येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

तेलंगणात १५ लाख गाठींची घट
तेलंगणा राज्यातही यंदा कापूस उत्पादन वाढेल, असा अंदाज सुरवातीच्या काळात वाटत होता. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे त्यात घट झाली आहे. तलंगणा कापूस महामंडळाचे मुख्य सचिव के. रमेश म्हणाले, ‘‘यंदा सुरवातीला राज्यात ६५ लाख गाठी उत्पादन होईल, असा अंदाज मात्र आता ५० लाख गाठीच उत्पादन होईल असे दिसते.’’

महाराष्ट्रात ८० टक्के क्षेत्रावर प्रादुर्भाव
‘‘महाराष्ट्रातील जवळपास ३४ लाख हेक्टरवर म्हणजेच तब्बल ८० टक्के लागवड क्षेत्रावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, परंतु नुकसानाची तीव्रता ही परिस्थिती आणि जागेनुसार वेगळी आहे,’’ असे राज्याच्या कृषी विभागाचे संचालक एस. एल. जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात घट किती झाली, यावर कापूस उद्योग आणि शासन यांनी मंथन सुरू केले आहे, तसेच कापसाची प्राथमिक खरेदी संपली असून, आता नवीन कापूस उत्पादन अंदाजाची शक्यता आहे.

७५ टक्केच वेचणी
‘‘हंगामाच्या सुरवातीला कापूस सल्लागार मंडळ आणि भारतीय कापूस महामंडळाने यंदा मागील वर्षापेक्षा यंदा उत्पादन वाढाचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु नोव्हेंबरमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने दोन्ही राज्यांनी शेतकऱ्यांना कापूस पीकच डिसेंबरपर्यंत नष्ट करण्यास सांगितले. नोव्हेंबरपर्यंत कापसाच्या दोन ते तीनच वेचण्या झाल्या आणि केवळ ७५ टक्के कापूस निघाला. त्यानंतर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. कापूस सल्लागार मंडळाने आधी ४०० लाख गाठींचा आणि नंतर कमी करून ३७७ लाख गाठींचा अंदाज व्यक्त केला होता,’’ अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
संत एकनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...पैठण, जि. औरंगाबाद : पैठण येथील शांतीब्रह्म श्री...
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...