agriculture news in marathi, cotton puchase at low rates in khedakharedi, akola | Agrowon

खेडाखरेदीत कापूस कवडीमोल
गोपाल हागे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

शासकीय कापूस खरेदी बंद असल्याने खासगी व्यापारी मिळेल त्या भावाने खरेदी करीत आहेत. शासनाने तत्काळ खरेदी सुरू करावी. तसेच क्विंटलला किमान सात हजार रुपयांचा दर दिला, तरच कापूस उत्पादकांना परवडेल.
-रमेश बानाईत, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

अकोला ः सप्टेंबरमध्ये शेवटच्या टप्प्यात आलेल्या संततधार पावसाने काढणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सध्या ज्या कापसाची वेचणी सुरू झाली तो अगदी कवडीमोल म्हणजेच ३५०० ते ३८०० रुपये क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. शासनाने तातडीने कापसाची खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी कापूस उत्पादकांनी केली आहे. 

 केंद्राने मध्यम धाग्याच्या कापसाला ४०२०; तर लांब धाग्याला ४३२० रुपये दर २०१७-१८ या हंगामासाठी जाहीर केलेला आहे. या हंगामात कापसाचा दर्जा सुरवातीलाच खालावलेला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बराच काळ पाऊस पडल्याने वेचणीला आलेला कापूस ओला झाला होता. त्यामुळे कापूस ओलसर असल्याच्या कारणाने व्यापाऱ्यांनी अवघा अडीच हजारांच्या आत त्याची खरेदी केली. आता दर्जा सुधारला तरी ३८०० पर्यंत खरेदी केली जात आहे.

प्री-मॉन्सून लागवड असलेल्या क्षेत्रातून कापूस काढणीला दसऱ्यापासून वेग घेतला आहे. या मोसमात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे बोंड्या खराब झाल्या. एवढे होऊनही प्रादुर्भावापासून वाचलेल्या बोंड्या फुटायला सुरवात झाली त्या वेळी काही दिवस संततधार पाऊस पडला होता. यामुळे बोंड्या काळवंडल्या. यातून निघालेला कापूस एकरतर कवडीयुक्त निघाला. शिवाय पिवळसरही झाला. हा कापूस शेतकरी विक्री करीत आहेत. आता चांगल्या दर्जाचा कापूस निघायला आला तरी तोही याच दराने मागितला जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट या भागात प्री.-मॉन्सून कपाशीची लागवड झालेली आहे. मे महिन्यात अखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या या कापसाची काढणी सुरू झाली. 

सध्या शेतकरी हा कापूस विकून मोकळा होत आहेत. आगामी काळात दिवाळीसारखा मोठा सण असून रब्बीचीही चाहूल लागली आहे. या दोन्हीसाठी लागणारा पैसा कापूस विकून शेतकरी उभा करीत आहेत. शेतकऱ्यांची गरज पाहता व्यापारी कमी दराने मागणी करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाची खरेदी सुरू झाल्यास बाजारपेठेत आपोआप तेजी येते हा नेहमीचा अनुभव असल्याने शासनाच्या खरेदीची मागणी सर्वत्र जोर पकडत आहे.

इतर अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...
देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...