नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस खरेदीत अडीच लाख क्विंटलवर घट

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस खरेदीत अडीच लाख क्विंटलवर घट
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस खरेदीत अडीच लाख क्विंटलवर घट

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-१९ च्या खरेदी हंगामात भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि खासगी खरेदीदारांकडून एकूण २१ लाख ९० हजार ४८९ क्विंटल कापूस खरेदी झाली. हमीभावापेक्षा खुल्या बाजारात जास्त दर मिळाले. त्यामुळे यावर्षी राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाची कापूस खरेदी होऊ शकली नाही. दुष्काळी स्थितीमुळे उत्पादनात घट आल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत खरेदीत २ लाख ७४ हजार ८३९ क्विंटलनी घट झाली.

नांदेड जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) नांदेड येथील खरेदी केंद्रावर ९ हजार ५४७ क्विंटल, धर्माबाद येथील केंद्रावर ५४ क्विंटल, कुंटूर येथील केंद्रावर ७ हजार ३७४ क्विंटल अशी एकूण १६ हजार ९७५ क्विंटल कापूस खरेदी झाली. खुल्या बाजारात नांदेड येथे ८ हजार ३८७ क्विंटल, भोकर येथे २ लाख ७५ हजार १९३ क्विंटल, धर्माबाद येथे २ लाख ४५ हजार ८७९ क्विंटल, हदगावात ११ हजार ३५५ क्विंटल, कुंटूर येथे ९ हजार ८७५ क्विंटल, किनवटमध्ये ४२ हजार ७५ क्विंटल कापूस खरेदी झाली. खासगी व्यापाऱ्यांनी एकूण ५ लाख ९२ हजार ७६४ क्विंटल कापूस खरेदी केली.

नांदेड जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी खरेदीदार यांची एकूण ६ लाख ९ हजार ७३९ क्विंटल कापूस खरेदी झाली. प्रतिक्विंटल ५ हजार ५५० ते ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले.

परभणी जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत सीसीआय आणि खासगी खरेदीदारांनी एकूण १४ लाख ६८ हजार ६७३ क्विंटल खरेदी केली. परभणी येथे २ लाख २ हजार ४२२ क्विंटल, सेलू येथे ३ लाख ५७ हजार ७८५ क्विंटल, मानवत येथे ४ लाख ७६ हजार ४०३ क्विंटल, पाथरी येथे ५४ हजार ८९ क्विंटल, पूर्णा येथे ३ हजार २५ क्विंटल, ताडकळस येथे १० हजार ६१० क्विंटल, बोरी येथे १२ हजार ८७५ क्विंटल, जिंतूर येथे २ लाख ३१ हजार २९० क्विंटल, गंगाखेड येथे ७१ हजार २०० क्विंटल, सोनपेठ येथे ४८ हजार ९४४ क्विंटल कापूस खरेदी झाली. यामध्ये सीसीआयची ३० हजार ३८ क्विंटल, खासगी खरेदीदारांच्या १४ लाख ३८ हजार २८५ क्विंटल कापूस खरेदीचा समावेश आहे. प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २५० ते ६ हजार ४२० रुपये दर मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातील ७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांत एकूण १ लाख १२ हजार ७७ क्विंटल कापूस खरेदी झाली. हिंगोली येथे ४४ हजार १२६ क्विंटल, वसमत येथे ८ हजार ७०० क्विंटल, जवळाबाजारात ५५ हजार ९०९ क्विंटल, आखाडा बाळापूर येथे ३ हजार ३४२ क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयच्या ४४ हजार ५६९ क्विंटल, तर खासगी खरेदीदारांच्या ६७ हजार ५०८ क्विंटल कापसाचा समावेश आहे. प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ५४०० ते ६ हजार १०० रुपये दर मिळाले.

सुरवातीला पाच हजार रुपये क्विंटलपेक्षा कमी दर होते. अखेरच्या टप्प्यात ते सहा हजारांवर पोचले होते. त्यामुळे कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला. दुष्काळी स्थितीमुळे परभणी जिल्ह्यात कापूस उत्पादनात घट झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा २ लाख ६५ हजार ९८६ क्विंटलची, तर नांदेड जिल्ह्यात ८ हजार ८८५३ क्विंटल कापूस खरेदी कमी झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com