agriculture news in marathi, cotton purchasing status, khandesh, maharashtra | Agrowon

खानदेशातील खरेदी केंद्रांवर कापूस आवक नाहीच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017
सध्या जीनिंगमध्येही फारशी कापूस आवक नाही. जीनिंगचालक ४५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर द्यायला तयार आहेत. जीनिंगची स्थिती बिकट आहे त्यात सीसीआयकडे कमी दरांमुळे कापूस आवकच होत नसल्याचे चित्र आहे. 
- संदीप एल. पाटील, खासगी जीनिंगचालक
जळगाव : खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) १३ कापूस खरेदी केंद्रे सुरू होऊन १० दिवस झाले, पण यातील एकाही केंद्रावर एक बोंडही कापूस आलेला नाही. खुल्या बाजारात शेतकऱ्यांना ४५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत असल्याने या केंद्रांवर कुठलीही आवक होत नसल्याचे चित्र आहे. 
 
जिल्ह्यात २५ ऑक्‍टोबरनंतर एकामागून एक अशी खरेदी केंद्र सीसीआयने सुरू केली. सर्वांत प्रथम नंदुरबार येथील केंद्र सुरू झाले. नंदुरबारसह जळगाव, शेंदूर्णी, जामनेर, बोदवड, एरंडोल, चाळीसगाव, रावेर, चोपडा, शिरपूर, शहादा, पाचोरा येथे खरेदी केंद्र सुरू झाले. यातील कुठल्याही केंद्रात कापूस खरेदी झालेली नाही. या केंद्रात उत्तम दर्जाच्या कापसाला कमाल ४३२० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. तर खासगी व्यापारी गावोगावी जाऊन किंवा थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन ४५०० रुपये प्रतिक्विंटल या दरात कापूस खरेदी करीत आहेत.
 
त्यामुळे या केंद्रांमध्ये कुठलीही आवक होत नसल्याचे चित्र आहे. अर्धाअधिक कापूस गुजरातलगतच्या जिनिंगमध्ये चोपडा, शहादा, शिरपूर भागांतून अर्धाअधिक कापूस गुजरातमध्ये गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या जिनिंगमध्ये पोचला आहे. दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर गुजराती जिनर्सच्या मध्यस्थांची खानदेशात कापसाची खेडा खरेदी सुरू होती. आता तिसऱ्या, चौथ्या वेचणीचा कापूस यायला सुरवात होताच पुन्हा खेडा खरेदी सुरू झाली आहे. 
 
सीसीआयने मागील हंगामात खुल्या बाजारात कापसाची खरेदी केली होती. म्हणजेच खुल्या बाजारात जे प्रचलित दर होते त्यात आपल्या केंद्रात येणाऱ्या कापसाची खरेदी केली होती. यंदा फक्त हमीभावातच कापूस खरेदीवर सीसीआय अडून राहिले तर कुठलीही कापूस खरेदी होणार नाही. त्यामुळे सीसीआयला खुल्या बाजारात कापूस खरेदीशिवाय पर्याय नाही, असे मत कापूस बाजारपेठ विश्‍लेषकांनी म्हटले आहे. 

इतर बातम्या
कुपोषण मुक्तीसाठी शेतकऱ्याने शेवगा...नाशिक  : कुपोषण निर्मूलनाच्या कार्यास आपलाही...
पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरीपुणे : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुणे...
नाफेडच्या तुर खरेदीचा चुकारा...श्रीरामपूर, जि. यवतमाळ  : महिला शेतकऱ्याच्या...
शेतीप्रश्‍नावर कॉंग्रेसचा मोर्चायवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या...
पलटी नांगर, फवारणी पंप योजनेला चांगला...जळगाव : थेट अनुदान (डीबीटी) पद्धत लागू असतानाही...
मनपाडळेच्या श्रमदानाला अनेकांचे हातघुणकी, जि. कोल्हापूर : मनपाडळे गावातील...
पेरण्या खोळंबल्या; जोरदार पावसाची...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे...
राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागूमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
सांगली जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे...सांगली ः जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कृषी...
आषाढी पालखी सोहळ्याच्या समन्वयासाठी...पुणे  : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी पुण्यातून...
सातारा जिल्ह्यात २३ लाख रोप लागवडीचे...सातारा  : जिल्ह्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड...
मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
‘एसएमएस’ अटीमुळे हजारो शेतकरी...लातूर : शासनाने राज्यातील चार लाखापेक्षा जास्त...
जळगावमधील अनेक भागांत राष्ट्रीयीकृत...जळगाव  ः जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही :...पुणे : उसाची थकीत देणी आणि दूधदरप्रश्‍नी...
वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पास...मुंबई : पुणे जिल्ह्यातील मौजे धानेप (ता. वेल्हे)...
जळगाव जिल्ह्यात मका आवक निम्म्यावर; दर...जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून...नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत...
एचटी बियाणे ‘एसआयटी’ला मुदतवाढीची मागणीनागपूर : राज्यात अवैधरीत्या पुरवठा होणाऱ्या एचटी...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री...नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२...