खानदेशात कपाशीची खेडा खरेदी थांबली

खानदेशात कपाशीची खेडा खरेदी थांबली
खानदेशात कपाशीची खेडा खरेदी थांबली

जळगाव : धुळे व जळगाव जिल्ह्यांत मागील चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने केळीवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. तसेच सिंचन केलेला हरभरा पिकामध्ये रोग वाढण्याची भीती आहे. तसेच गावोगावी जाऊन केली जाणारी कपाशीची खेडा खरेदी नुकसानीच्या भीतीने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहे. धुळे बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेवरही परिणाम झाल्याची माहिती मिळाली.

धुळे जिल्ह्यात मंगळवारी (ता. 5) दुपारी 2 नंतर हलका पाऊस झाला. सुरवातीला तुरळक पाऊस होता. नंतर हलका पाऊस झाला. सायंकाळपर्यंत तुरळक, हलका असा पाऊस सुरू होता. त्याचा साक्री, धुळे व शिंदखेडा परिसरांतील फुलोऱ्यावर आलेल्या भेंडी, हरभरा आदी पिकांना फटका बसला आहे. तसेच कपाशीचेही किरकोळ नुकसान झाले. धुळे, पिंपळनेर व साक्री येथील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक सुरू आहे. परंतु ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे कांद्याची नासाडी होण्याच्या भीतीने लिलावांनाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. काही शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणणे टाळले.

जळगाव जिल्ह्यातही चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. बुधवारीही (ता. 6) ढगाळ वातावरण कायम होते. मंगळवारी किरकोळ पाऊस झाला. काही वेळेतच पाऊस तुरळक सरी बंद झाल्या. पण ढगाळ वातावरणाच्या भीतीने अनेक व्यापाऱ्यांनी कपाशीची खेडा खरेदी बंद ठेवली आहे. ढगाळ वातावरणामुळे केळी पिकात विविध कीड रोगाला आमंत्रण देणाऱ्या बुरशी सक्रिय होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com