agriculture news in marathi, cotton rate reaches 5000 per quintal in malkapur | Agrowon

मलकापूरला कापसाचे दर पाच हजारांपर्यंत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

अकोला : बोंड अळीने या हंगामात पिकाचे एकीकडे अतोनात नुकसान झालेले असताना अाता कापसाचे दर सुधारत अाहेत. दरांमध्ये अागामी दोन महिन्यांत अाणखी सुधारणा होण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून व्यक्त होऊ लागला अाहे. हंगामात सुरवातीला ३८०० ते ४००० पर्यंत स्थिरावलेले कापसाचे दर अाता काही दिवसांपासून सातत्याने सुधारत अाहेत. 

अकोला : बोंड अळीने या हंगामात पिकाचे एकीकडे अतोनात नुकसान झालेले असताना अाता कापसाचे दर सुधारत अाहेत. दरांमध्ये अागामी दोन महिन्यांत अाणखी सुधारणा होण्याचा अंदाज व्यापारी सूत्रांकडून व्यक्त होऊ लागला अाहे. हंगामात सुरवातीला ३८०० ते ४००० पर्यंत स्थिरावलेले कापसाचे दर अाता काही दिवसांपासून सातत्याने सुधारत अाहेत. 

या हंगामात राज्यात कपाशीचे सुमारे ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झालेली अाहे. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकता घटली असून ज्यांना कापूस येत अाहे, अशांच्या मालात (कपाशी) कवडीचे प्रमाण दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक अाहे. तरीही बाजारपेठेत मागणी असल्याने कापसाचे दर साडेचार ते पाच हजार दरम्यान मिळू लागले अाहेत.  

कापूस पिकाचे नुकसान झाल्याने त्याचा परिणाम साहजिकच कापूस गाठीच्या उत्पादनावर पडणार अाहे. या हंगामात दरवर्षीच्या तुलनेत ५० लाख गाठींपेक्षा अधिक उत्पादन कमी होण्याची चिंता भेडसावत अाहे. दुसरीकडे अाताच्या परिस्थितीत देशासह विदेशी बाजारपेठेतही कापसाची मागणी वाढत असल्याचे सांगितले जात अाहे. याच कारणांनी कापसाच्या दरांमध्ये तेजी येऊ लागली अाहे. विदर्भात कापसाची प्रमुख बाजारपेठ म्हणून अोळख असलेल्या मलकापूर (जि. बुलडाणा) येथील बाजारात ४७०० ते ५००० रुपये क्विंटलने खरेदी केल्या जात अाहे. इतरत्रही साडेचार हजारांपेक्षा अधिक क्विंटलला दर मिळू लागला अाहे.  

मलकापूर येथील बाजारात कापूस ४७०० ते पाच हजार रुपये क्विंटलने खरेदी केला जात अाहे. अामच्या जिनिंगमध्ये दररोज दोन हजार ते अडीच हजार क्विंटलची अावक अाहे. इतरांकडेही अशीच अावक अाहे. बाजारपेठेत मागणी असल्याने चांगल्या दर्जाच्या कापसाला पाच हजारांपर्यंत दर दिला जात अाहे. येत्या दोन महिन्यांत अाणखी दरवाढीची शक्यता अाहे. 
- त्रिलोकचंद दंड, विरचंद नसरी कॉटन, मलकापूर, जि. बुलडाणा

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...