अकोटमध्ये कापसाचे दर पोचले ५६६० रुपयांवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : या अाठवड्यात कापसाच्या दरात सातत्याने सुधारणा होत असून शुक्रवारी वऱ्हाडातील अकोटमध्ये कापसाला या हंगामातील सर्वाधिक ५६६० रुपये क्विंटलला दर मिळाला. मलकापूर बाजारात कापूस ५१०० ते ५५०० दरम्यान विकल्या जात अाहे.  

बोंडअळीमुळे या वर्षातील कापूस उत्पादनाला जोरदार तडाखा बसला अाहे. उत्पादन घटले असतानाच कापसाच्या दर्जावरही परिणाम झाला आहे. कवडीचे प्रमाण वाढले अाहे. वऱ्हाडात कापसासाठी मलकापूर, अकोट या बाजारातील दर मार्गदर्शक मानले जाते.

या हंगामात गेल्या पंधरा दिवसांपासून दोन्ही बाजारात कापसाच्या दरात तेजी अाहे. शुक्रवारी (ता.२२) अकोट येथील बाजारात कापसाला ५६६० एवढा दर मिळाला. शनिवारी (ता.२३) कापूस ५२०० ते  ५४०० रुपये दरम्यान विकला. सध्या या बाजारात दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस विक्रीसाठी येत अाहे. मलकापूरमध्येही विविध जिनिंगमधील खरेदीच्या ठिकाणी हजारो क्विंटल कापूस विक्रीला येत अाहे. मलकापूर बाजारात ५१०० ते ५५०० रुपये दराने कापसाची खरेदी-विक्री झाली.

साधारणतः १५ दिवसांपूर्वी कापसाला ४५०० पर्यंत दर मिळत होता. हा दर थेट ५००० रुपयांवर जाऊन पोचला अाहे. बोंडअळीमुळे कापूस उत्पादनाचे २५ ते ४० टक्क्यांवर नुकसान झाले अाहे. चांगल्या दर्जासाठी अोळखला जाणारा प्री-मॉन्सून कापूस यावर्षी अपेक्षित प्रमाणात झालेला नाही.

त्यातच कोरडवाहू कपाशीलासुद्धा बोंडअळीने तडाखा दिला. यामुळे शासनालाही कापूस उत्पादकांना मदत जाहीर करावी लागली अाहे.  सध्या जो काही कापूस अाहे, त्याला चांगला दर मिळू लागला. कमी अावक, वाढलेली मागणी यामुळे दररोज दरांमध्ये चढ-उतार होताना दिसून येतात.  

या हंगामात बोंडअळीने कापसाचे २५ टक्के नुकसान झालेले अाहे. उत्पादन घटले. त्यातच सध्या पाकिस्तान व बांग्लादेशातून कापसाची मागणी चांगली अाहे. अाता विक्रीला येणारा कापूस चांगला असून दर सुधारत अाहेत. अाणखी वाढण्याची शक्यता अाहे. किमान सहा हजारांपर्यंत दर पोचेल अशी शक्यता वाटते.    - संतोष झुनझुनवाला, कापूस व्यापारी, अकोट जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com