agriculture news in Marathi, cotton rate stuck at rupees 4500 in gram purchase in Khandesh, Maharashtra | Agrowon

कापसाची खेडा खरेदी ४५०० रुपयांवरच अडकली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कापूस, भरडधान्याला दर नाहीत. शेतकऱ्यांना कमी पावसाचा फटका बसला आहे. आता दर नसल्याने ते अडचणीत आहेत. 
- आत्माराम बळिराम पाटील, शेतकरी, कापडणे (ता. धुळे)

जळगाव ः धुळेसह जळगाव जिल्ह्यात कापसाची खेडा खरेदी फारशी होत नसल्याची स्थिती आहे. दरही महिनाभरापासून ४५०० रुपये प्रतिक्विंटल पुढे गेलेले नाहीत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कापसाचा कमी दर असून, उत्पादन खर्च मात्र वाढल्याने कापूस उत्पादकांना त्याचा मोठा फटकाही सहन करावा लागत आहे. 

कुठलीही दरवाढ होत नसल्याने काही मोठ्या कापूस उत्पादकांनी कापूस साठवून ठेवला आहे. परंतु फरदड कापूस (खोडवा) न घेता क्षेत्र रिकामे करण्यास कृत्रीम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. या क्षेत्रावर मका, बागायती हरभरा, गहू आदी पिके घेण्याचे नियोजन केले आहे. जळगाव जिल्ह्यात जवळपास १२ हजार हेक्‍टर पूर्वहंगामी कापसाच्या पिकाखालील क्षेत्र रिकामे झाले आहे. तर धुळ्यातही तापीकाठावरील शिंदखेडा, शिरपूर तालुक्‍यातील कापूस उत्पादकांनी क्षेत्र रिकामे करून इतर रब्बी पिके पेरल्याची माहिती मिळाली. 

सीसीआयच्या केंद्रांवर बोंडही नाही
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत सीसीआयचे (भारतीय कापूस महामंडळ) मिळून १३ खरेदी केंद्र १२ दिवसांपूर्वी सुरू झाले आहेत. तर पणन महासंघाचे धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यात मिळून सहा केंद्र सुरू आहेत. या केंद्रांवर ४१२०, ४२२० आणि कमाल ४३२० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. या केंद्रांवर खुल्या बाजाराच्या तुलनेत कमी दर असल्याने कुठलीही आवक झालेली नाही. पणन महासंघाच्या केंद्रांवर फक्त अडीच क्विंटल कापूस खरेदी झाल्याची माहिती मिळाली. तर सीसीआयच्या केंद्रांवर एक बोंडही कापूस आलेला नाही. या वृत्तास पणन संचालक संजय पवार यांनी दुजोरा दिला. 

धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे, शिंदखेडा तालुक्‍यात खेडा खरेदी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातही चोपडा, जळगाव, धरणगाव, पाचोरा भागात खेडा खरेदी सुरू आहे. सध्या चांगल्या दर्जाचा (१० टक्के आर्द्रता) कापूस येत आहे. वेचणीसाठीची मजुरी यंदा किलोमागे एक रुपया वधारली. तसेच इतर खर्चही वाढले आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे.   

फरदडवरही अळी व किडी
फरदड कापसाच्या पिकावरही गुलाबी बोंड अळी आढळत आहे. चोपडा, जामनेर, जळगाव, शिरपूर भागात या तक्रारी अधिक आहेत. त्यासंबंधी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया
कापसाला मागच्या वर्षीपेक्षा कमी दर आहेत. शेतकऱ्यांना दरांची प्रतीक्षा आहे. फरदड कापसावरही रोगराई असल्याने शेतकरी पीक काढून क्षेत्र रिकामे करीत आहेत. 
- अनिल विश्राम पाटील, शेतकरी, सावखेडासीम (ता. यावल, जि. जळगाव)
 

इतर बातम्या
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून...
नांदेड: माहूर मंडळात मुसळधारमाहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून...
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सरऔरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने...
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर...लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या...
पोपट पाळल्यास तुरुंगवासमुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू...
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना...औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील...
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे...मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
पाणीउपशावर नियंत्रण आवश्यक ः राजाराम...नाशिक : शेतीसाठी व शहरात औद्योगिक क्षेत्राच्या...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
करमाळा बाजार समितीसाठी १८६ जणांचे अर्जकरमाळा, जि. सोलापूर  : करमाळा कृषी उत्पन्न...
द्राक्ष उत्पादनात योग्य वेळी छाटणीला...सोलापूर : ‘‘द्राक्ष हे संवेदनशील पीक आहे....
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
बोंड अळीच्या अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चा...बुलडाणा : चिखली तालुक्यातील कापूस उत्पादक...