agriculture news in Marathi, cotton season ends in early November in Marathwada, Maharashtra | Agrowon

नोव्हेंबरमध्येच कपाशीचा झाडा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पहिल्या बहराच्या फुटलेल्या सर्व बोंडांची वेचणी केली. शिल्लक राहिलेली पऱ्हाटी उपटून त्या ठिकाणी हरभरा पेरणार आहोत.
- वामन दंडवते, सोन्ना, ता. जि. परभणी.
 

परभणी ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील जिरायती क्षेत्रावरील कापूस पिकांचा यंदा तब्बल तीन ते चार महिने आधीच झाडा झाला आहे. सर्व बोंडे फुटल्यानंतर कापसाची वेचणी केलेल्या शेतामध्ये आता केवळ पऱ्हाटी शिल्लक राहिली आहे. सिंचनाची व्यवस्था असेलेले शेतकरी पऱ्हाटी उपटून हरभरा, गहू घेण्याचे नियोजन करत आहेत. यंदा बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बोंडे किडकी झाली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली असून, बाजारभावदेखील कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यामध्ये २ लाख ६९ हजार ७७९ हेक्टर, परभणी जिल्ह्यामध्ये १ लाख ९७ हजार ७०९ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यामध्ये ५४ हजार ६०५ हेक्टरवर, तीन जिल्ह्यांत एकूण ३ लाख ४४ हजार ९३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तीनही जिल्ह्यांतील कपाशीच्या क्षेत्रात यंदा घट झाली आहे. जुलै-आॅगस्ट महिन्यांत वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला. त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याने बोंडे सडून नुकसान झाले. यंदा कपाशीवर आलेल्या शेंदरी बोंडअळीमुळेही मोठे नुकसान झाले आहे.

त्यात सोयाबीनच्या काढणीच्या हंगामामध्येच कापूस वेचणी आली होती. परंतु मजूर न मिळाल्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच राहिला. उन्हामध्ये तळल्यामुळे बोंडाचे वजन घटले. दरम्यानच्या काळात झाडावरील उर्वरित बोंडे फुटली. अनेक भागांत फुटलेल्या सर्व बोंडांची वेचणी एकदाच करण्यात आली. यंदा एकाच बहराचे उत्पादन मिळाले. त्यामुळे वेचणीनंतर शेतामध्ये केवळ पऱ्हाटी शिल्लक राहिली आहे.

जमिनीतील ओलाव्याच्या उपलब्धतेनुसार जिरायती क्षेत्रावरील कपाशीच्या ४ ते ५ वेचण्या होत. त्यामुळे वेचणी हंगामदेखील फेब्रुवारी-मार्च महिन्यांपर्यंत चालत असे. परंतु यंदा कापसाचा हंगाम तब्बल तीन ते चार महिने लवकर संपला आहे. पऱ्हाटी उपटून हरभरा, गहू पेरणीसाठी जमीन तयार करण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...
विठ्ठला या सरकारला सुबुध्दी दे !...पंढरपूर, जि. सोलापूर : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर...
खरिपाचा पेरा अद्यापही माघारलेलाचनवी दिल्ली ः देशात गुरुवारपर्यंत (ता. १२) खरिपाची...
पंढरीत विठ्ठलाला दुग्धाभिषेक करुन...अकोला : कर्नाटक व केरळच्या धर्तीवर राज्यातही...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यात मोठ्या धरणांमध्ये यंदा अधिक साठापुणे : राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटात सुरू...
शाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना...जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव...
शेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोडबुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी...
सेवा कसली, ही तर चक्क लूटबॅंकांच्या सेवांमध्ये काही त्रुटी असतील तर...
‘परभणी शक्ती’ने मिळेल ज्वारीला बळआपला आहार हा रिजन अन् सिझन स्पेसिफीक असला पाहिजे...