agriculture news in Marathi, cotton seed company licence cancel, Maharashtra | Agrowon

आंध्र प्रदेशातील एका कंपनीचा परवाना `एचटी` बियाणेप्रकरणी रद्द
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात संबंधित कंपनीचा परवाना रद्द झाला असला तरी, नमुने त्याच राज्यात घेण्यात आले होते. कायद्यानुसार कारवाईसाठी त्या-त्या राज्यात नमुने घेणे क्रमप्राप्त ठरते. बियाणे पुरवठा झाल्यानंतर स्थानिक  निरीक्षक नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवितात. त्यात काही आक्षेपार्हय आढळल्यास कारवाई होते.
- सुभाष काटकर,  मुख्य गुणवत्ता निरीक्षक, 
कृषी आयुक्‍तालय, पुणे

नागपूर ः आंध्र प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या कापूस वाणात तणनाशक सहनशील जीन (एचटी) सापडल्याने या कंपनीचा आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील परवानाच रद्द करण्यात आला आहे. या कंपनीचे कापूस वाण खरिपात महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. परंतु आंध्र प्रदेशातील कारवाईचा राज्यातील विक्रीत कोणताच अडसर ठरणार नसल्याचे कृषी खात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

केंद्र सरकारने ‘एचटी’ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या वाण चाचणीला परवानगी दिली नाही. महाराष्ट्रात गेल्या हंगामात चार नामांकित कंपन्यांच्या वाणात ‘एचटी’ जीन आढळला होता. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. बहुतांश कंपन्यांद्वारे आंध्र प्रदेशात बीजोत्पादन आणि त्याच ठिकाणी प्रक्रिया करून देशभरात बियाणे पुरवठा केला जातो. अशाच एका नामांकीत कंपनीच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ‘एचटी’ जीन असल्याचा खुलासा झाला. 

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा कृषी विभागाकडून याची दखल घेत त्या कंपनीचा दोन्ही राज्यांतील परवाना रद्द केला. या कंपनीद्वारे महाराष्ट्रात कापूस बियाणे पुरवठा होतो. त्यामुळे हंगामात या कंपनीच्या राज्यातील बियाणे वितरणावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कृषी खात्यातील गुण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांनी मात्र ही शक्‍यता फेटाळली. महाराष्ट्रात बियाण्यांचा पुरवठा झाल्यानंतर नमुन्यांच्या तपासणीत ‘एचटी’ जीन आढळला तर महाराष्ट्रात कारवाई करता येते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...