agriculture news in Marathi, cotton seed selling from 25 may in state, Maharashtra | Agrowon

राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासून
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

जिल्ह्यात कापूस बियाण्याची सुमारे अडीच लाख पाकिटे गोदामांमध्ये दाखल झाली असून, त्यांची विक्री २५ मेपासून शेतकऱ्यांना विक्रेते करतील. बियाण्याचा काळाबाजार व फसवणूक रोखण्यासाठी बियाण्याची विक्री १ जूनपासून करण्याचे आदेश शासनाने बदलले आहेत. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
 

जळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची कापूस बियाणे खरेदीत फसवणूक होऊ नये, काळाबाजार थांबावा यासंबंधी कापूस बियाण्याची शेतकऱ्यांना २५ मेपासून विक्री करण्यासंबंधीचे नवे आदेश शासनाने नुकतेच जारी केले आहेत. बियाणे वितरक, विक्रेत्यांकडे बियाणे उत्पादकांनी बियाण्याचा पुरवठा विक्रेत्यांकडे सुरू केला आहे.

राज्यात सुमारे ४२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड अपेक्षित आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड विदर्भ, मराठवाडा, खानदेश, नगर, मालेगाव (जि. नाशिक) भागात अनेक शेतकरी करतात. पूर्वहंगामी लागवडीस २५ मेनंतर सुरवात केली जाते. कापूस लागवडीत जळगाव जिल्हा राज्यात या हंगामात सर्वात पुढे राहणार असून, सुमारे पाच लाख १९ हजार हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. यात सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड अपेक्षित आहे. यापाठोपाठ यवतमाळ व विदर्भातील इतर जिल्हे कापूस लागवडीत अग्रेसर 
आहेत. 

जळगाव जिल्ह्यात गोदामांमध्ये सुमारे अडीच लाख पाकिटे बियाणे दाखल झाले असून, काही कंपन्यांनी आपल्या वितरकांकडे हे बियाणे पाठविले आहे. त्याची विक्री २५ मेपासून करणे बंधनकारक आहे. लागवड १ जूनपासून करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

काळाबाजार रोखण्यासाठी बदलला निर्णय
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासंबंधी कापूस बियाणे १ जूनपासून शेतकऱ्यांना विक्री करण्याचे आदेश शासनाने बजावले होते. आपल्याकडे बियाणे मिळणार नाही म्हणून खानदेशातील शेतकरी गुजरातेत जाऊन कापूस बियाण्यांची खरेदी करीत होते. यामुळे काळाबाजार व फसवणूक हे प्रकार याची शक्‍यता लक्षात घेता शासनाने कापूस बियाणे २५ मे पासून विक्री करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी कार्यालयास प्रशासनाला दिले आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...