पंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया एकादशी) राज्याच्या कानाकोपऱ्यातून शनिवारी (ता.
बातम्या
जळगाव : जिल्ह्यात पारोळा, अमळनेर व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी स्थिती भीषण होत असून, कोरडवाहू कापसाचे पीक जवळपास हातचे गेले आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, तातडीने उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
जळगाव : जिल्ह्यात पारोळा, अमळनेर व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी स्थिती भीषण होत असून, कोरडवाहू कापसाचे पीक जवळपास हातचे गेले आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, तातडीने उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
पारोळा तालुक्यातील बोरी नदीच्या पुढील इंधवे, जिराळीचा भाग, अमळनेरातील डांगर, जानवे, मंगरूळ, धुळे तालुक्यातील नवलनकर आणि त्यालगतच्या शिंदखेडा तालुक्यातील भिलाणे व भागात भीषण दुष्काळी स्थिती आहे. हा भाग कोरडवाहू पट्ट्यात असून, मागील तीन वर्षे पाऊसच न झाल्याने सद्यःस्थितीत विहिरी, कूपनलिकांमध्ये पाणी खोल गेले आहे. सिंचनाबरोबरच पिण्यासाठीही पाणी नाही. लालसर, मुरमाड जमीन या भागात अधिक आहे.बोरी नदीच्या पलीकडे स्थिती बिकट आहे. जूनमध्ये सुरवातीला जोरदार पाऊस झाला होता. नंतर मात्र पावसाने निराशा केली. कापूस प्रमुख पीक आहे. सोबतच ज्वारी, उडदाची पेरणी झाली होती; परंतु उडीद वगळता सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे.
पूर्वहंगामी कापसाचे पीक अपवाद वगळता कुठल्याही गावात फारसे नाही. या तिन्ही तालुक्यांमधील सुमारे ५० गावांना मोठा फटका बसला आहे. सलग चार वर्षे पाऊस नसल्याने मोठी समस्या आहे. दुग्धव्यवसायावरही परिणाम झाला आहे. पशुधन विकण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. कारण चारा, पाण्याची कमतरता आहे.
ऐन सणासुदीच्या काळात पाणीटंचाई असल्याने शेतकऱ्यांना वणवण करावी लागते. अशीच स्थिती राहिल्यास स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. पैशांसाठी पशुधन विक्रीसह शेतातील बांधावरील झाडे विकावी लागली. पाऊसच नसल्याने सर्व पर्याय संपल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
- 1 of 563
- ››