Agriculture News in Marathi, Cotton, Vasantrao Naik Agriculture University | Agrowon

‘वनामकृवि‘चे बीटी वाण येत्या हंगामात
विनोद इंगोले
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

एक वर्ष आणखी चाचण्या घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात केवळ वनामकृवीचे बीटी वाण उपलब्ध होणार आहे.

नागपूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड-४४ या वाणात बीजी-२ जीनचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्याला सर्व प्रकारच्या मान्यतादेखील मिळाल्या असून, २०१८ मधील खरीप हंगाम मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक लाख पाकीट विक्रीचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. एम. व्यंकटेश्‍वरलू यांनी दिली. 

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा प्रभार डॉ. व्यंकटेश्‍वरलू यांच्याकडे आहे. शासकीय सुटी असतानादेखील त्यांनी विद्यापीठातील विविध विभागांचा नुकताच आढावा घेतला. डॉ. व्यंकटेश्‍वरलू म्हणाले, की अकोला कृषी विद्यापीठाच्या एका वाणाला बी.जी-२ करीता मान्यता आहे. मात्र त्यावर काही प्रमाणात कीड-रोग आल्याने एक वर्ष आणखी चाचण्या घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात केवळ वनामकृवीचे बीटी वाण उपलब्ध होणार आहे.
 
अकोला कृषी विद्यापीठाचे बडतर्फ कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या ताफ्यात तीन शाही वाहने होती. यातील केवळ दोनच वाहने कुलगुरूंकरिता असावी, तिसरे वाहन अन्य अधिकाऱ्याला देण्याची सूचना डॉ. व्यंकटेश्‍वरलू यांनी कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांना दिली. 

कृषी विद्यापीठ कायद्यात करणार बदल
कृषी विद्यापीठ अधिनियमात बदलाकरिता राज्यपालांनी डॉ. व्यंकटेश्‍वरलू यांच्या नेतृत्वात समिती गठीत केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, की हा कायदा परिपूर्ण असावा याकरिता प्रयत्न सुरू आहे. या समितीची एक बैठक झाली असून, दुसरी बैठक लवकरच होईल. कृषी विद्यापीठांना अडचणीत आणणाऱ्या खासगी कृषी महाविद्यालयाच्या मनमानीला चाप लावण्यासाठी अनेक कडक उपाययोजना यात सुचविण्यात आल्या आहेत. दूरगामी परिणाम करणारे बदल यात सुचविले जाणार असून, त्याकरिता खुद्द राज्यपाल सी. विद्यासागर राव आग्रही आहेत.

 

टॅग्स

इतर कृषी शिक्षण
‘आनंद निकेतन`ने घेतला शिक्षण,...स्वावलंबनातून शिक्षण तसेच सहिष्णुता, समता,...
पर्यावरण, वन्यजिवांची काळजी घ्या... मानवी हस्तक्षेपामुळे आज सुमारे ४१ हजार प्रजाती...
‘वनामकृवि‘चे बीटी वाण येत्या हंगामातनागपूर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...