agriculture news in Marathi, Cotton Vesting Machine Project | Agrowon

कापूस वेचणी यंत्र प्रकल्प अखेर गुंडाळला
विनोद इंगोले
गुरुवार, 7 मार्च 2019

नागपूर ः कापूस वेचणीमधील श्रम, वेळ व पैशाची बचत होण्यात उपयोगी ठरणारे वेचणी यंत्र गेल्या १५ वर्षांत विकसित करण्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला यश आले नाही. परिणामी दर्जेदार कापूस उत्पादनाच्या उद्देशालादेखील खीळ बसली आहे. या प्रकल्पातील एका खासगी कंपनीने आपले तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य काढल्याने गेल्या वर्षभरापासून हे काम थांबल्याचे सांगितले जाते. 

नागपूर ः कापूस वेचणीमधील श्रम, वेळ व पैशाची बचत होण्यात उपयोगी ठरणारे वेचणी यंत्र गेल्या १५ वर्षांत विकसित करण्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला यश आले नाही. परिणामी दर्जेदार कापूस उत्पादनाच्या उद्देशालादेखील खीळ बसली आहे. या प्रकल्पातील एका खासगी कंपनीने आपले तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य काढल्याने गेल्या वर्षभरापासून हे काम थांबल्याचे सांगितले जाते. 

महाराष्ट्रात सुमारे ४० लाख हेक्‍टरवर कापूस होतो. देशातही कापसाखाली मोठे क्षेत्र आहे. परंतु या शेतीत यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध नसल्याने मजुराकरवी बहुतांश कामे करावी लागतात. परिणामी उत्पादकता खर्च वाढतो. वेचणी होताना कचरा होतो. त्यामुळे जिनिंगचे काम प्रभावित होते. प्रक्रिया उद्योजकांकडूनदेखील भारतीय कापसाला त्यामुळेच नकार मिळतो. त्यामुळे कापूस वेचणी यंत्र असावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. 

त्याची दखल घेत नागपुरातील राष्ट्रीय कापूस संशोधन केंद्राकडे यंत्र तयार करण्याचे काम देण्यात आले. सीआयसीआरने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व शेगाव येथील अभियांत्रीकी महाविद्यालयाकडे त्या वेळी हे काम सोपविले. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ४० ते ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. बराचसा निधी संशोधक संस्थांना वितरितही करण्यात आला. परंतु २००४ पासून हा प्रकल्प पैलतीरावरच लागला नाही. 

खासगी कंपनीचा असहकार
सीआयसीआरकडे यंत्र तयार करण्यासाठी वर्कशॉप नव्हते. परिणामी त्यांनी नागपुरातील एका ट्रॅक्‍टर उत्पादक कंपनीचे वर्कशॉप वापरासाठी घेतले. त्यासोबतच कंपनीने काही निधीदेखील प्रकल्पाकरिता दिला होता. परंतु २००४ पासून कापूस वेचणी यंत्रावर काम सुुरू असताना संशोधक संस्थांना हे यंत्र गेल्या १५ वर्षांत विकसित करता आले नाही.

कापूस वेचणीची मजुरी सुरवातीला पाच आणि हंगामाच्या शेवटी दहा रुपये किलो राहते. ५० रुपये किलो कापसाचा सध्या दर आहे. त्यातील १२ रुपये किलो वेचणी मजुराचाच वाटा असतो. त्यातच मजूर मिळत नाही ही समस्या वेगळीच आहे. एक मजूर सरासरी दहा किलो कापूसच वेचताे. त्यामुळे कापूस वेचणी यंत्राची गरज आहे. - उमाकांत उपासे, कापूस उत्पादक शेतकरी, 
पथ्रोट, ता. अचलपूर, जि. अमरावती

पाण्याची उपलब्धता असल्याने आमच्या भागात कापूस मोठ्या क्षेत्रावर होतो. परंतु हंगामात मजुराच्या उपलब्धतेची अडचण राहते. आमच्या भागात ५ ते ७ रुपये किलोने कापूस वेचणीचे काम होते. त्यामुळे कापूस शेतीच्या यांत्रिकीकरणाची गरज आहे.- बाळू नानोटे, निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

खासगी संस्थेकडून वर्कशॉप व निधी दिला जात होता. त्यांनी वर्षभरापासून प्रकल्पातून माघार घेतली. येत्या एक दोन वर्षांत आम्हीच यंत्र विकसीत करण्यासाठी पुढाकार घेऊ, त्यादृष्टीने प्रयत्न चालविले आहेत.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

इतर अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...
देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...