agriculture news in marathi, countable conference on farm issues in Delhi, Maharashtra | Agrowon

शेती प्रश्‍नांसाठी दिल्लीत आज गाेलमेज परिषद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

गाेलमेज परिषदेचे आयाेजन हा भाबडेपणा आहे. ज्यांनी ७० वर्षांत सरकारे चालवली, ज्यांनी ७० वर्षांत शेतकरीविराेधी कायदे केले आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले ते काय शेतकऱ्यांचे प्रश्‍न साेडविणार. शेतकऱ्यांचे प्रश्‍न साेडविण्यासाठी शेतकरीविराेधी कायदे बदलांसाठी मूलभूत काम झाले पाहिजे. आम्हाला आणि सुकाणू समितीला परिषदेचे निमंत्रण नाही.’’
- रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य 

पुणे ः शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या केंद्र सरकारसमारे प्रभावीपणे मांडण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने भाजप वगळता सर्व प्रमुख राजकीय पक्षांना एकत्रित करीत गाेलमेज परिषदेचे आयाेजन केले आहे. बुधवारी (ता.२८) दुपारी २ वाजता परिषदेचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ॲड. याेगेश पांडे यांनी दिली. 

देशातील विविध १९३ शेतकरी संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कार्यकारिणी मंडळाच्या वतीने ( वर्किंग ग्रुप ) नवी दिल्ली येथील कॉनस्ट्यिट्यूशन क्लब येथे परिषद हाेणार आहे. या परिषदेकरिता देशातील भाजप वगळता सर्व प्रमुख ३२ पक्षांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये शेतमालाला उत्पादन खर्चावर दीड पट हमीदर, संपूर्ण कर्जमुक्ती यावर संसदेत मांडलेल्या खासगी विधेयकावर विविध पक्षांनी आपल्या भूमिका मांडण्यास आमंत्रित करण्यात आले आहे. 

या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव, सीताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू व देशातील इतर दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेस काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना, टीएसआर, टीडीपी, वायएसआर, सीपीआय, सीपीएम, आरजेडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, एआयडीएमके, बीजेडी, डीएमके, जेडीयू, अकाली दल, आम आदमी पार्टी, नॅशनल कॅान्फरन्स, तृणमुल काँग्रेस व इतर पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला असून, संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी सर्वांना निमंत्रण दिले आहे. निमंत्रणाचाच भाग म्हणून खा. शेट्टी यांनी नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली हाेती. खा. शेट्टी यांच्याबराेबर व्ही. एम. सिंह, राजाराम सिंह, रामपाल जाट, योगेंद्र यादव, आयकन्नू, हानन मौला, किरण विसा, प्रेमसिंह घेलावर, अखिल गोगाई, चंद्रशेखर कोडीअळी, डॉ. सुनीलम, मेधाताई पाटकर, कविता कुरुगंट्टी आदी शेतकरी नेते उपस्थित असणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...