agriculture news in Marathi, Counties record temperature in chandrapur, Maharashtra | Agrowon

चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी तापमानाची नोंद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाड्यात सकाळपासून वाढ होत आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात पुन्हा तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूरमध्ये ४१.३ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांची तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाड्यात सकाळपासून वाढ होत आहे. कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसात पुन्हा तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील चंद्रपूरमध्ये ४१.३ अंश सेल्सिअसची देशातील उच्चांची तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

गेल्या आठवड्यापासून राज्यातील काही भागात सकाळी दहा वाजल्यापासून उकाडा जाणवायला सुरवात होत आहे. दुपारी उन्हाच्या कडाक्यामुळे तापमानाचा पारा चाळिशी ओलांडत आहे. दुसरीकडे अचानक काही भागात ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे जोरदार वारा, गारा, मेघगर्जनेसह जोराचा पाऊस पडत आहे. हा पाऊस दिलासा देणारा वाटत असला तरी तापमानात किंचित घट होत आहे.

 बंगालचा उपसागर आणि श्रीलंका, कोमोरिन परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यातच तमिळनाडूचा दक्षिण भाग ते कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या भागात सरकण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील मध्य प्रदेश, गुजरात या भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणामही राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे. 

आज (शनिवारी) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार वारा सुटून मेघगर्जनेसह गारांचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात कोरडे हवामान राहील. त्यामुळे वातावरणात काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहणार असून उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.  
शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रूझ) ३२.५, अलिबाग ३२.२, रत्नागिरी ३३.७, डहाणू ३४.१, पुणे ३७.६ नगर ३९.४, जळगाव ३९.८, कोल्हापूर ३६.८, महाबळेश्वर ३३.५, मालेगाव ४०.०,  नाशिक ३६.५, सांगली ३९.०, सातारा ३७.१, सोलापूर ३९.१, औरंगाबाद ३७.०, परभणी शहर ३९.४, नांदेड ३८.५, अकोला ३९.५, बुलडाणा ३८.४, ब्रह्मपुरी ३९.७, चंद्रपूर ४१.३, नागपूर ३८.९, वाशीम ३७.०, वर्धा ३९.०, यवतमाळ ३८.०.

इतर अॅग्रो विशेष
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...