हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना अखेरची मानवंदना

हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना अखेरची मानवंदना
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना अखेरची मानवंदना

बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्याच्या दोन सुपुत्रांनी बलिदान दिले. या वीर जवानांना शनिवारी (ता. १६) सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मूळगावी हजारोंच्या उपस्थितीत अाणि गगनभेदी घोषणांच्या निनादात आणि लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात अाला. संजय राजपूत यांच्यावर मलकापूर येथे तर नितीन राठोड यांना गोवर्धननगर तांडा येथे त्यांच्या मुलांनी चिताग्नी दिला. 'अमर रहे...अमर रहे' अशा घोषणांनी दोन्ही ठिकाणचे परिसर दणाणून गेले होते.  गुरुवारी (ता. १४) पुलवामा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात जवान संजय राजपूत अाणि जवान नितीन राठोड यांना वीरमरण प्राप्त झाले. ही वार्ता जिल्ह्यात समजतास सर्वत्र शोककळा पसरली. हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी बंद पाळून शहिदांना अादरांजली वाहण्यात अाली. शनिवारी शहीद संजय राजपूत अाणि शहीद नितीन राठोड या दोन्ही जवानांचे पार्थिव अौरंगाबादमार्गे अनुक्रमे मलकापूर अाणि लोणार तालुक्यातील गोवर्धननगर येथे नेण्यात अाले. तत्पूर्वी अौरंगाबाद विमानतळावर शासकीय मानवंदना देण्यात अाली.  शहीद जवान संजय राजपूत यांचे पार्थिव मलकापूर येथे पोचल्यानंतर शहरात उसळलेल्या हजारोंच्या संख्येतील जनसमुदायाने ‘अमर रहे’ च्या गगनभेदी घोषणा दिल्या. पार्थिव नेण्यात अालेल्या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्वत्र गर्दी झाली होती. शहीद संजय यांना त्यांचा मोठा मुलगा जयेश याने मुखाग्नी दिला. तत्पूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, स्थानिक अामदार चैनसुख संचेती, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. गोवर्धन नगर तांडा येथील शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव गावात पोचल्यानंतर नातेवाइकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अत्यंत सामान्य कुटुंबातील शहीद नितीन यांनी सैन्यात भरती होऊन देशसेवा केली. त्यांच्या पार्थिवावर कौटुंबिक विधी अाटोपल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा जीवन याने मुखाग्नी दिला. या दोन्ही ठिकाणी अंत्यसंस्काराला सैन्यदलाचे अधिकारी, पोलिस, लोकप्रतिनिधी, अधिकारी अाणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com