agriculture news in marathi, Court orders state goverment to give 4 lakhs for Pesticide victims family | Agrowon

शेतकरी कुटुंबीयांना चार लाखांची भरपाई द्या
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नागपूर : फवारणीमुळे विषबाधा होत दगावलेल्या शेतकरी कुटुंबीयांना चार लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुुरुवारी (ता. २२) दिले. राज्य सरकारने विषबाधेला कारणीभूत असल्याच्या कारणावरून पाच कंपन्यांवर ६० दिवसांची बंदी घातली. त्यांची या प्रकरणातील भूमिका तपासत दोषी सिद्ध झाल्यास त्यांच्याकडूनदेखील या रकमेची वसुली करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

नागपूर : फवारणीमुळे विषबाधा होत दगावलेल्या शेतकरी कुटुंबीयांना चार लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुुरुवारी (ता. २२) दिले. राज्य सरकारने विषबाधेला कारणीभूत असल्याच्या कारणावरून पाच कंपन्यांवर ६० दिवसांची बंदी घातली. त्यांची या प्रकरणातील भूमिका तपासत दोषी सिद्ध झाल्यास त्यांच्याकडूनदेखील या रकमेची वसुली करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

यवतमाळ येथील जम्मू आनंद यांनी मुंबईत रेल्वे पूल दुर्घटनेतील मृतांना भरपाईसाठी एक न्याय आणि यवतमाळसह राज्यात मरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदतीसाठी दुसराच न्याय लावला जात असल्याचा आरोप केला होता. 

याच दुजाभावातून राज्य सरकारने फवारणीदरम्यान विषबाधा होत मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अवघी दोन लाख रुपयांची मदत केल्याचे सांगत, त्यांनी या प्रकरणी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती.  या प्रकरणी गुरुवारी (ता. २२) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अशा प्रकरणात मदतीसाठी काही धोरण निश्‍चित आहे का? अशी विचारणा केली. त्यावर सरकारकडून उत्तर न आल्याने फवारणीदरम्यान मृत्यू झालेल्यांच्या वारसांना चार लाख रुपये भरपाईचे आदेश न्यायालयाने दिले. यापूर्वी दोन लाख रुपयांची भरपाई सरकारने दिली आहे. त्या कुटुंबीयांना आणखी दोन लाख रुपये द्यावेत, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. 

याचिका काढली निकाली
कीटकनाशकावर कायमस्वरूपी बंदीचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. राज्य सरकारला केवळ ६० दिवस बंदी घातला येते, असे प्रतिज्ञापत्र अवर मुख्य सचिव (कृषी) विजयकुमार यांनी दाखल केले होते. न्यायालयाने या प्रकरणात कीटकनाशक कंपन्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यास सांगितले. बंदी घातलेल्या कंपन्या दोषी असतील, तर त्यांच्याकडूनदेखील शेतकऱ्यांना देय असलेल्या भरपाईची वसुली करावी, असेही आदेशात म्हटले आहे. कीडनाशक निरीक्षकांचीदेखील चौकशी करून त्यांनी आपल्या कामात हयगय केल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सहा आठवड्यांचा कालावधी या प्रक्रियेसाठी देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. 

राज्य सरकारने यापूर्वी अवघी दोन लाख रुपयांची मदत विषबाधितांसाठी जाहीर केली होती. न्यायालयाने आता चार लाख रुपये भरपाईचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती दोषी आढळल्यास कीटकनाशक कंपन्यांकडूनदेखील भरपाई रकमेची वसुली व्हावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
- अरविंद वाघमारे, याचिकाकर्त्याचे वकील

इतर अॅग्रो विशेष
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...
‘मेकुणू’ चक्रीवादळ होणार अतितीव्रपुणे : अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या ‘मेकुणू’...
कोकणात शनिवारपासून पाऊस?पुणे : अरबी समुद्रात अालेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ...
खरिपासाठी पैशांची तजवीज करण्यात शेतकरी...अकोला  ः अागामी हंगामाला अाता अवघा...
सेस वसुलीच्या मुद्यावर प्रशासन, जळगाव...जळगाव ः भाजीपाला व फळे नियमनमुक्त केल्याने...
यंदा वापरा घरचेच सोयबीन बियाणेपुणे : राज्यात गेल्या हंगामात झालेल्या अवेळी...
प्रयोगशील कांदा शेतीत ठळक अोळख मिळवलेले...नाशिक जिल्हा कांदा उत्पादनात अग्रेसर आहे. त्यातही...
गोकुळानं ‘गणित’ नाही मांडलंपशुपालनातून दूध व्यवसाय म्हणजे मुळातच उद्योग आहे...
ब्राझीलचा धडा घेणार कधी?सातत्याने दोन वर्षांच्या चांगल्या पाऊसमानानंतर...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...