agriculture news in marathi, court question state government on SIT report of Pesticide poisoning | Agrowon

एसआयटी अहवाल का लपविता? विषबाधा प्रकरणावरून न्यायालयाचे ताशेरे
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नागपूर : कीटकनाशक विषबाधा मृत्यूप्रकरणासंदर्भाने नियुक्‍त एसआयटीचा अहवाल सादर करण्यास दोन महिन्यांपासून सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यावरूनच याप्रकरणात काही तरी लपविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे दिसेत, या शब्दांत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकावर ताशेरे ओढले. दोन दिवसांत एसआयटीचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिले. 

नागपूर : कीटकनाशक विषबाधा मृत्यूप्रकरणासंदर्भाने नियुक्‍त एसआयटीचा अहवाल सादर करण्यास दोन महिन्यांपासून सरकार टाळाटाळ करीत आहे. त्यावरूनच याप्रकरणात काही तरी लपविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे दिसेत, या शब्दांत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकावर ताशेरे ओढले. दोन दिवसांत एसआयटीचा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याचा आदेशही न्यायालयाने दिले. 

कीटकनाशक विषबाधाप्रकरणी मृत्यूला दोषी असलेल्या सरकारमधील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कंपन्यांची चौकशी करावी, मृतकांना दहा लाख रुपये मिळावे, याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारकडून विशेष चौकशी समिती (एस.आय.टी) गठण करण्यात आली. त्याच वेळी क्रॉप केअर फाउंडेशनला याप्रकरणात प्रतिवादी केले जावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला. 

त्यांची ही मागणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्य करत क्रॉप केअर फाऊंडेशनलाही याप्रकरणात प्रतिवादी केले आहे. याच काळात एसआयटीने आपला अहवाल सरकारला सादर केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. त्यामुळे हा अहवाल न्यायालयासमोर यावा, अशी मागणी जम्मू आनंद यांनी केली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व सपना जोशी यांच्या समोर याप्रकरणाची सुनावणी झाली. 

दोन महिन्यांपासून अहवाल गुलदस्तात 
१३ ऑक्‍टोबर २०१७ रोजी विशेष चौकशी समितीचे (एसआयटी) गठण करण्यात आले. या समितीला चौकशीसाठी तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु आजवर दोन महिने उलटूनदेखील हा अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे काही तरी लपविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, या शब्दांत उच्च न्यालयाच्या नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढले. सुरवातीला सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी नागपूरला हिवाळी अधिवेशन असल्याने विधिमंडळासमोर हा अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाईल, असेही सांगितले गेले. परंतु अधिवेशन संपले, विधिमंडळासमोर अहवाल आलाच नाही. न्यायालयासमोरदेखील आला नाही. त्यामुळे शुक्रवारपर्यंत हा अहवाल खंडपीठासमोर सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

इतर अॅग्रो विशेष
पैशाकडेच जातोय पैसाभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात...
वाढवूया मातीचा कससंयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी...
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...
खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेतीखारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे,...
वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून...भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...