agriculture news in marathi, Cow and cub story on motherhood | Agrowon

हंबरून वासराले, चाटती जवा गाय...!
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

कोल्हापूर ः ‘‘हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय...’’ असा काळजाचा ठाव घेणारा अनुभव आज कोल्हापूरकरांनी घेतला. गाय आणि तिच्या वासराप्रतीचं प्रेम, त्याच्याही पलीकडे जाऊन एकमेकांपासून दूर जाण्याची भीती, त्या भीतीतून गायीचं पुन्हा हंबरणं आणि आलेल्या वाटेवरून पुन्हा परत जाणं...असा हा सारा सहा तासांचा थरार सम्राटनगर, प्रतिभानगर आणि पांजरपोळ परिसराने अनुभवला. अखेर या दोन्ही माय-लेकरांना एकाच टेम्पोतून पांजरपोळमध्ये नेऊन दाखल करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. 

कोल्हापूर ः ‘‘हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय...’’ असा काळजाचा ठाव घेणारा अनुभव आज कोल्हापूरकरांनी घेतला. गाय आणि तिच्या वासराप्रतीचं प्रेम, त्याच्याही पलीकडे जाऊन एकमेकांपासून दूर जाण्याची भीती, त्या भीतीतून गायीचं पुन्हा हंबरणं आणि आलेल्या वाटेवरून पुन्हा परत जाणं...असा हा सारा सहा तासांचा थरार सम्राटनगर, प्रतिभानगर आणि पांजरपोळ परिसराने अनुभवला. अखेर या दोन्ही माय-लेकरांना एकाच टेम्पोतून पांजरपोळमध्ये नेऊन दाखल करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. 

सम्राटनगर परिसरातील मालती अपार्टमेंट परिसरात रस्त्याच्या कडेला गायीने वासराला जन्म दिला; पण भटक्‍या कुत्र्यांनी उच्छाद मांडला. वासरावर झडप टाकण्याचा ते प्रयत्न करू लागले. वासराच्या पायात अजूनही बळ आले नव्हते. त्यातही ते जन्मतःच एका पायाने अपंग. हा सारा प्रकार परिसरातील नागरिक अनुभवत होते; मात्र नेमकं काय करायचं, हे कुणालाच समजेना. अखेर एकाने व्हाईट आर्मीला या घटनेची माहिती सकाळी सातच्या सुमारास दिली आणि व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

महापालिकेला विनंती केल्यानंतर बैलगाडी आली आणि बैलगाडीतून वासराला पुढे नेऊन मागून गायीला नेण्याचे प्रयत्न सुरू झाले. गाय निम्म्या वाटेपर्यंत यायची आणि पुन्हा मागे फिरायची. नेमकं काय चाललं आहे, लेकराला ही मंडळी कुठं घेऊन निघाली आहेत, अशा प्रश्‍नांचं जणू काहूर तिच्या मनात दाटलेलं. नुकत्याच जन्माला आलेल्या आपल्या लेकरापासून तिला थोडासाही दुरावा नको होता आणि म्हणूनच ती सैरभैर झाली होती. चार-साडेचार तासांनंतरही गाय निम्म्यापर्यंत यायची आणि परत आलेल्या वाटेने मागे फिरायची, असाच प्रकार सुरू राहिला. अखेर व्हाईट आर्मीचे जवान आणि पांजरपोळच्या टीमने दुसरी युक्ती काढली. एक मोठा टेम्पो बोलावला आणि त्यात या दोन्ही मायलेकरांना एकत्र बसवून पांजरपोळ संस्थेत दाखल करण्याचा निर्णय झाला आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला. 

यांनी केले विशेष प्रयत्न...
व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्रशांत शेंडे, विष्णू कुंभार, योगेश ढोबले, अरुण सांगावकर, संजय बागल, बैलगाडीवान भीमराव जांभळे यांनी गाय व वासराला पांजरपोळ संस्थेत दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

वासरू जन्मतः एका पायाने अपंग आहे. त्यामुळे त्याच्यावर आम्ही योग्य ते उपचार सुरू केले आहेत. गाय आणि वासरू दोघांचीही जबाबदारी आता संस्थेने घेतली आहे.
- डॉ. राजकुमार बागल, पांजरपोळ संस्था

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...