agriculture news in marathi, Cow milk must get 27 rupees per liter, Shetkari Sangatna agitation | Agrowon

गाईच्या दुधाला २७ रुपये दरासाठी शेतकरी संघटनेची निदर्शने
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सांगली : दूध संकलन व खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. मात्र, शासनाने दिलेला आदेश दूध संस्था पाळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांचा आर्थिक तोटा होतो आहे. महानंदा नेही दूध खरेदीचा दर कमी केला आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपये असा दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका शेतकरी संघटनेने केली आहे. दूध खरेदीचे दर वाढवले नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

सांगली : दूध संकलन व खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रतिलिटर दोन रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. मात्र, शासनाने दिलेला आदेश दूध संस्था पाळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादकांचा आर्थिक तोटा होतो आहे. महानंदा नेही दूध खरेदीचा दर कमी केला आहे. गाईच्या दुधाला प्रति लिटर २७ रुपये असा दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका शेतकरी संघटनेने केली आहे. दूध खरेदीचे दर वाढवले नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेने दूध दर वाढीबाबत बुधवारी (ता. १०) दुपारी एक वाजता निदर्शन केले. या वेळी संजय कोले, सुनील फराटे, रावसो दळवी, अल्लाउद्दीन जमादार, शीतल राजोबा, नवनाथ पोळ, रामचंद्र कणसे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवदेन दिले.

या निवदेनात म्हटले आहे की, "दूध खरेदी करणाऱ्या संस्थांनी गाईच्या दुधाला प्रति लिटरला दोन रुपये तर म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर तीन रुपयांनी दर वाढण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेशाचे पालन महिनाभर केले. त्यानंतर दूध खरेदी करण्याचे दर कमी केले आहेत. सरकाने अशा दूध खरेदी करणाऱ्या संस्थावर कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तरच दूध खरेदीचे दर वाढतील. दूध संघ आणि संस्थांनी दूध खरेदीमध्ये आणखी कपात केली असून गाईच्या दुधाचे प्रति लिटर १७ ते २० रुपये केले आहेत. यामुळे याचा फटका दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बसतो आहे. 

दुधाचे दर घटवून खरेदी केलेल्या दुधाच्या विक्री दरात कोणताही बदल केलेला नाही. मध्यस्थांचे कमिशन, वाहतूक, प्रक्रिया, याचा विचार केला तर प्रति लिटर जास्तीत जास्त आठ ते दहा रुपये खर्च होतो. "अमूल'' दूध संस्था २७ रुपयांने दूध खरेदी करते. दुधाचे दर कमी करणे ही बाब गंभीर आहे. असे असतानादेखील सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. दूध खरेदी दरात वाढ केली नाही तर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी दिला.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...