Agriculture News in Marathi, cow MIlk procurment price reduced by Gokul Sangh, Kolhapur | Agrowon

गाईच्या दूध खरेदी दरात ‘गोकुळ’कडून २ रुपये कपात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गाईचे दूध शिल्लक राहून संघाला तोटा होत असल्याचे कारण देत कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) बुधवार (ता.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गाईचे दूध शिल्लक राहून संघाला तोटा होत असल्याचे कारण देत कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) बुधवार (ता. १) पासून गायीच्या दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे दोन रुपयांनी कपात केली आहे.

 याचा फटका संघाला दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना बसणार आहेत. ही कपात किती दिवसांसाठी असेल याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नकार दिला असला, तरी किमान मार्चपर्यंत तरी याच दराने खरेदी सुरू राहण्याची शक्‍यता गोकुळच्या प्रशासनाने व्यक्त केली. गायीच्या दुधात कपात केली असली म्हैशीचे खरेदी दर आहे, तेच ठेवण्यात आले आहेत. 

सध्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला गोकुळ दूध संघ उत्पादकांना प्रतिलिटर २७ रुपये इतका प्रतिलिटर दर देतो. यात दोन रुपयांनी कपात केल्याने आता हा दर २५ रुपये इतका होणार आहे. याच प्रमाणात खालील फॅट व एसएनएफनुसार दर कमी होतील. मंगळवारी (ता.३१) सायंकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर बुधवार (ता. १) पासून या दराने खरेदी सुरू झाली.
 
येत्या दोन दिवसांत याबाबतची लेखी माहिती गावागावांतील दूध संकलन केंद्रांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती गोकुळकडून देण्यात आली. गोकुळकडे दररोज साडेसहा लाख लिटर दुधाचा पुरवठा विविध दूध संस्थांकडून होतो. यापैकी सध्या साडेतीन लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याचे गोकुळच्या प्रशासनाने सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...