agriculture news in Marathi, cow pea at rupees 2800 in jalgaon, Maharashtra | Agrowon

जळगावात चवळी शेंगा प्रतिक्विंटल २८०० रुपये
टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जानेवारी 2018

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात मंगळवारी (ता. २) चवळी शेंगांची फक्त एक क्विंटल आवक झाली. तिला एकच २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

 चवळी शेंगांची लागवड जिल्ह्यात फक्त जामनेर, पाचोरा, जळगाव भागात केली जाते. सध्या वातावरण थंड असल्याने चवळीच्या वाढीसह काढणीवर परिणाम झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी रब्बी चवळीचे पीक चांगले न बहरल्याने ते शेतकऱ्यांनी काढून टाकले. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारातील आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. 

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात मंगळवारी (ता. २) चवळी शेंगांची फक्त एक क्विंटल आवक झाली. तिला एकच २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

 चवळी शेंगांची लागवड जिल्ह्यात फक्त जामनेर, पाचोरा, जळगाव भागात केली जाते. सध्या वातावरण थंड असल्याने चवळीच्या वाढीसह काढणीवर परिणाम झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी रब्बी चवळीचे पीक चांगले न बहरल्याने ते शेतकऱ्यांनी काढून टाकले. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला असून, बाजारातील आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. 

बाजारात आल्याची ७५ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १२०० ते २४०० रुपये दर होता. वाटाण्याची ४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला. कांद्याची ७२० क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३३२० रुपये दर होता.

बटाट्याची २०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल २७५ ते ४७५ रुपये दर मिळाला. मेथीची १३ क्विंटल आवक झाली, तीस प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर होता. टोमॅटोची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३०० ते ९०० रुपये दर मिळाला. भरीताच्या वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ६०० ते ९०० रुपये दर होता. फूलकोबीची १८ क्विंटल आवक होऊन १५०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

भेंडीची १० क्विंटल आवक तर १२०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. बोरांची १३ क्विंटल आवक झाली तर दर प्रतिक्विंटल १००० ते १७०० रुपये होता. पेरूची दोन क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक झाली, तीस प्रतिक्विंटल ११०० ते २२०० रुपये दर मिळाला. गवारची कुठलीही आवक झाली नाही. तसेच पालक, पोकळ्याचीही जेमतेम अशीच आवक होती, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...