agriculture news in marathi, cows rate deepens by 40 percent in ahmednagar district | Agrowon

दुभत्या जनावरांचे दरही ४० टक्‍क्‍यांनी खाली
सूर्यकांत नेटके
सोमवार, 7 मे 2018

नगर : सहा महिन्यांपासून दुधाला दर नसल्याचे गंभीर परिणाम दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही झाले आहेत. दूध व्यवसायाला सातत्याने प्राधान्य दिलेल्या नगर जिल्ह्यामधील नावाजलेल्या जनावरांच्या बाजारात दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. याशिवाय मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या खरेदी-विक्रीतही मोठी तफावत आहे. बाजारात दुभती जनावरे विक्री करतानाची शेतकऱ्यांची उलघालही त्रस्त करणारी आहे. 

नगर : सहा महिन्यांपासून दुधाला दर नसल्याचे गंभीर परिणाम दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही झाले आहेत. दूध व्यवसायाला सातत्याने प्राधान्य दिलेल्या नगर जिल्ह्यामधील नावाजलेल्या जनावरांच्या बाजारात दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. याशिवाय मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या खरेदी-विक्रीतही मोठी तफावत आहे. बाजारात दुभती जनावरे विक्री करतानाची शेतकऱ्यांची उलघालही त्रस्त करणारी आहे. 

राज्यात आठ महिन्यांपासून दुधाला दर नाही. दरवाढ होईल या आशेने शेतकरी तोट्यातला व्यवसाय सुरू ठेवत जनावरे संभाळली जात आहेत. मात्र आठ महिन्यानंतरही शासन दुधाला दर देत नाही. सध्या प्रति लिटरमागे दहा रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्यामुळे राज्यात पाच दिवसांपासून मोफत दूधवाटप करून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला जात आहे.

दुधाला दर नसल्याने शेतकरी त्रस्त आहेतच; पण दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीवरही गंभीर परिणाम झाला आहे. नगर जिल्ह्यामध्ये लोणी (ता. राहाता) काष्टी (ता. श्रीगोंदे), घोडेगाव (ता. नेवासा) पाथर्डी, शेवगाव येथे जनावरांचे बाजार भरतात. या बाजारात दुभत्या गाई, म्हशींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. काष्टी, घोडेगाव येथून तर मराठवाडा, पुणे, सोलापूर भागांतील शेतकरी जनावरांची खरेदी- विक्री करतात. आठ महिन्यांपासून दर नसल्याने दुभत्या जनावरांचे दर तीस ते चाळीस टक्‍क्‍यांनी खाली आले आहेत. बाजारातील आवक कमी झाली आहे. दर कमी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत, असे बाजार समितीमधील राजू चौधरी यांनी सांगितले. दुभत्या जनावरांनाच दर नाहीत, भाकड जनावरांना कोण घेणार, सध्या भाकड जनावरे वाटेल त्या किमतीत विकावी लागत असल्याचे विक्री घोडेगाव येथील दिलीप सोनवणे यांनी सांगितले.

शेतकरी, व्यापारी म्हणतात....
दुधाच्या धंद्याला लोक प्राधान्य देतात. जनावरे दावणीला दिसली तरी समाधान मिळते. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून दर मिळत नसेल तर काय करणार, बाजारात दुभती गाय विकायला आणली तरी ग्राहक नाही. घेतल्या दरापेक्षा कमी दरात नाईलाने विकावी लागते.
- नारायण चौधरी, शेतकरी, घोडेगाव (ता. नेवासा)

मी अनेक दिवसांपासून दूध व्यवसाय करतो. यंदासारखी परिस्थिती कधी झाली नव्हती. जनावरे विकायची वेळ आलीय, पण जनावरांनाही बाजारात दर मिळत नाही. मागील काही महिन्यांचा विचार करता तीस ते चाळीस टक्‍के कमी दराने विकावी लागत आहेत.
- भारत गारुडकर, शेतकरी, तिसगाव (ता. पाथर्डी)

‘‘दुभत्या गाईंचा मी खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतो. दुधाला दर नसल्याने खरेदी-विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दर मिळत नसल्याने काही प्रमाणात तोटा सोसावा लागतो.’’
शेख सादीक रज्जाक, व्यापारी, कोरडगाव (ता. शेवगाव)

‘‘दुधाला दर नसल्याचा सगळ्याच बाबत परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना परवडत नसेल तर शेतकरी तरी काय करणार. बाजारात आवक कमी होत आहे. लोक परवडत नसेल तर खरेदी कशाला करतील?’’
- पिंटू गायकवाड, व्यापारी, घोडेगाव (ता. नेवासा)

नगर जिल्ह्यातील दुभत्या गाईंची बाजारातील स्थिती

   आवक  खरेदी विक्री  दर (रुपयात)
 काष्टी (ता. श्रीगोंदा) 
 आठ महिन्यांपूर्वी  ५०००  ३०००  ७० ते ९० हजार
 आताची  २०००  १०००  ३० ते ४० हजार
 घोडेगाव (ता. शेवगाव)
 आठ महिन्यांपूर्वी  ३००  १५०  ६० ते ९० हजार
 आताची  १५०  ७०-८०  ३५ ते ५० हजार
 शेवगाव
 आठ महिन्यांपूर्वी  १०० ते १३०  ७०-८०  ५० ते ८० हजार
 आताची  ३० ते ४०  २०-१५  ३० ते ४० हजार
 पाथर्डी
 आठ महिन्यांपूर्वी  २५ ते ३५  १५  ६० ते ८० हजार
 आताची  ५-१०  ५  ३५ ते ४५ हजार
 लोणी (ता. राहाता)
 आठ महिन्यांपूर्वी  ९४४  ३५९  १८ ते १ लाख ३५ हजार
 आताची  ९५५  २२०  २० ते ८० हजार

 

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...