agriculture news in marathi, CPI to agitate on farmers issue in Nashik | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाकपचा आज मोर्चा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक/नगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासह विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी नाशिक येथील विभागीय कार्यालयावर आज (ता. १६) शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.

नाशिक/नगर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासह विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी नाशिक येथील विभागीय कार्यालयावर आज (ता. १६) शेतकरी, कामगार व असंघटित कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी दिली.

या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे राज्यसचिव कॉ. तुकाराम भस्मे, राज्यसहसचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळाचे सदस्य कॉ. स्मिता पानसरे, कॉ. राजू देसले, जिल्हा सचिव कॉ. शांताराम वाळुंज, कॉ. भास्कर शिंदे, कॉ. हिरालाल परदेशी, कॉ. माणिकदादा सूर्यंवशी आदी करणार आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्यांना लागू करा, शेतकरी व शेतमजुरांना वयाच्या वर्षांनंतर हजार रुपये निवृत्ती वेतन मिळावे, कृषी पंपाचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी विरोधी धोरण मागे घ्यावे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान हजार रुपये दरमहा वेतन मिळावे, जिल्हा परिषद शाळा बंद निर्णय मागे घ्यावा, सेवा निवृत्त इ.पी.एस.अंतर्गत पेन्शनधारक साखर, वीज, विडी कामगार, कंत्राटी कामगार, सफाई कामगार, औद्योगिक कामगार, सहकारी संस्था कर्मचारी, विडी कामगारांना निवृत्ती वेतन मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे असे लांडे म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...