agriculture news in Marathi, cracking and bhuri infection on grape due to cold in Sangali District, Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात थंडीमुळे द्राक्षावर ‘क्रॅकिंग’, ‘भुरी’चा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
रविवार, 24 डिसेंबर 2017

थंडी द्राक्ष पिकासाठी चांगली आहे. पंरतु अतिथंडी द्राक्ष बागेसाठी धोक्‍याची आहे. अतिथंडीमुळे काश्या द्राक्षांवर क्रॅकिंग सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- दिलीप माने-पाटील, सार्वेड, ता. तासगाव

सांगली ः गेल्या चार दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष मण्याचे सेटिंग, मुळीचे काम मंदावले आहे. यामुळे द्राक्ष मण्याची फुगवण कमी होते आहे. काळी सोनाक्का, शरद सिडलेस, नाना परपल, कृष्णा सिडलेस या वाणांच्या द्राक्षांना क्रॅकिंग (तडा पडतोय) सुरू झाले आहे. त्यातच भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिल्ह्यात आगाप छाटणी घेणाऱ्या शेतकऱ्यांची द्राक्ष विक्रीला आली आहेत. डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीत यंदा हवामान चांगले राहणार आहे. जानेवारीच्या शेवटचा आठवडा आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा कडाक्याच्या थंडीची शक्‍यता आहे. या हवामान अंदाजाचीही शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. परिणामी शेतकऱ्यांना १३ ते १५ फेब्रुवारीनंतरच यंदा चांगले वातावरण राहण्याची शक्‍यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात सुमारे ४० टक्के द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी उशिरा फळ छाटणी घेतली आहे. काही ठिकाणी या द्राक्ष बागा सध्या फुलोरा अवस्थेत आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी थंडी व घडावर पडणारे दवबिंदू यामुळे घड कुजू लागले आहेत. त्यातच अगोदर घेतलेल्या द्राक्ष छाटणीतील द्राक्षांचे मणी मोठे झाले आहेत. पण थंडीमुळे त्याची वाढ होत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.  नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी द्राक्ष बाजारात आली. त्यावेळी १०० रुपये किलो दर मिळाला. त्यात बदलत्या वातावरणामुळे द्राक्षावर दावणी, भुरीचा प्रादुर्भाव वाढला आणि हजारो रुपये खर्चात भर पडली. 
व्यापारी पाडतायेत दर 

थंडीत द्राक्ष पिकाला उठाव व्हायला हवा, मात्र द्राक्ष व्यापारी थंडीच्या काळात उठाव होत नसल्याची वातावरण निर्मिती करून दर पाडतात, असा अनुभव सध्या शेतकऱ्यांना येतो आहे. त्यामुळे तयार द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. साध्या द्राक्ष पेटीला ३०० आणि काळ्या द्राक्षाला ३६० ते ४०० रुपये दर मिळतो आहे. तर कमी दर्जाच्या द्राक्षांना कमी दर मिळतो आहे. येत्या चार दिवस थंडी राहिली तर परस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्‍यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...