agriculture news in marathi, The creation of new revenue circles in parbhani,maharashtra | Agrowon

परभणी जिल्ह्यात नवीन महसूल मंडळ, तलाठी सजांची निर्मिती
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 4 मे 2018
नवीन महसूल मंडळे, तलाठी सजांच्या निर्मितीमुळे तलाठी पदांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे कामांचा कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची विविध प्रकारच्या प्रमाणपत्रासाठीची धावपळ कमी होईल.
-अकुंश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी, परभणी.
परभणी  ः परभणी जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या महसूल मंडळे आणि तलाठी सजांची फेररचना करण्यात आली आहे. नवीन महसूल मंडळे आणि तलाठी सजांच्या निर्मितीमुळे जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळाची संख्या ५२ आणि तलाठी सजांची संख्या ३१३ झाली आहे.
 
तलाठी सजा पुनर्रचना समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीने केलेल्या शिफारशीनुसार जिल्ह्यात नवीन महसुली मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी महसूल मंडळे आणि तलाठी सजांची फेरचना अंतिम केली आहे.
 
पूर्वी जिल्ह्यातील ९ तालुक्यात एकूण ३९ महसूल मंडळे आणि २३७ तलाठी साझा होते. फेररचनेनंतर नवीन १३ महसूल मंडळे आणि ७६ तलाठी सजांची भर पडल्यामुळे आता जिल्ह्यातील महसूल मंडळाची संख्या ५२ आणि तलाठी सजांची संख्या ३१३ झाली आहे.
 
नव्याने अस्तित्वात आलेली तालुकानिहाय महसूल मंडळे ः परभणी तालुकाः टाकळी कुंभकर्ण, जिंतूर तालुकाः दुधगाव, वाघी धानोरा, सेलू तालुका ःमोरेगाव, मानवत तालुका ः ताडबोरगाव, रामपुरी बुद्रुक, पाथरी ः कासापुरी, सोनपेठ तालुका ः शेळगाव, वडगाव, गंगाखेड तालुका ः पिंपळदरी, पालम तालुका ः पेठशिवणी, रावराजूर, पूर्णा तालुका ः कावलगाव.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...