agriculture news in marathi, creation of veterinary dispensaries Stopped due to Due to the restriction | Agrowon

निर्बंधामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यांची निर्मिती नाही
सू्र्यकांत नेटके
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

नगर ः अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांचे नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले असले तरी नवीन पदनिर्मितीवरील निर्बंध तसेच नवीन दवाखान्यांच्या स्थापनेसाठीचे निकष यामुळे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात २०११ नंतर नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना, तसेच अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची दर्जावाढ करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहे.

नगर ः अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांचे नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करण्याचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले असले तरी नवीन पदनिर्मितीवरील निर्बंध तसेच नवीन दवाखान्यांच्या स्थापनेसाठीचे निकष यामुळे राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात २०११ नंतर नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना, तसेच अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची दर्जावाढ करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहे.

नगर जिल्ह्यामध्ये ‘पशुवैद्यकीय दवाखान्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत'' असे वृत्त ॲग्रोवनने प्रकाशित केले होते. त्याची राज्याच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अवर सचिवांनी दखल घेतली असून, प्रस्ताव पडून राहण्याचे कारण स्पष्ट केले आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार, सध्या राज्यात ३२ पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, १६८ तालुका लघू पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालये, ६५ फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, एक हजार ७४१ श्रेणी एकचे पशुवैद्यकीय दवाखाने, दोन हजार ८४१ श्रेणी दोनचे पशुवैद्यकीय दवाखाने आणि तेरा तपासणी चौक्‍या कार्यरत असून, या संस्थांमार्फत राज्यातील शेतकरी/गोपालकांकडील पशुधनास आवश्‍यक त्या पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.

याव्यतिरिक्त महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठांतर्गत मुंबई, नागपूर, अकोला, परभणी, उदगीर व शिरवळ येथे असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातूनदेखील पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत.

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या १ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार ‘नवीन श्रेणीस एक’च्या पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यासाठी बिगर डोंगरी भागात पाच हजार पशुधनामागे एक, तर डोंगरी भागात तीन हजार पशुधनामागे एक दवाखाना असावा. तसेच नव्याने स्थापन करावयाच्या संस्थेपासून पाच किलोमीटर अंतरात दुसरी कोणतीही पशुवैद्यकीय संस्था कार्यरत नसावी, असे निकष निश्‍चित करण्यात आलेले आहेत.

नवीन श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी, गट-अ एक पद, ऋणोपचारक गट-ड एक पद आणि परिचर गट-ड एक पद अशा एकूण ३ पदांची, तर अस्तित्वात असलेल्या श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा दर्जावाढ करून त्याचे रूपांतर श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी, गट-अ या एका पदाची आवश्‍यकता आहे;
मात्र २ जून २०१५ च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार नवीन पदनिर्मिती पूर्णपणे बंद राहील, असे कळविण्यात आले.

नवीन पदनिर्मितीवर असलेले निर्बंध पाहता २०११ नंतर राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात नवीन श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्याची स्थापना, तसेच अस्तित्वात असलेल्या श्रेणी दोनच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा दर्जावाढ करून त्याचे रूपांतर श्रेणी-१ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आलेले नाही.

इतर बातम्या
महाबळेश्वरमध्ये हिमकणांची चादरमहाबळेश्वर, जि. सातारा  ः राज्यात सर्वत्र...
जलयुक्तमधील 'सुरूंग' कामाला पोलिस...पुणे : जलयुक्त शिवाराचा निधी गडप करण्यासाठी कृषी...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
‘एल निनो’चा यंदा माॅन्सूनला धोका नाहीपुणे ः प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर...
मागासवर्गीय तरुणांना उद्योगासाठी कर्जमुंबई  : मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना...
चाऱ्याचा होतोय कोळसाअकोला ः अत्यल्प पाऊस, विदर्भ, मराठवाड्यातील कोरडे...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...
मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
भारत हवामान बदलाला सर्वांत संवेदनशीललंडन ः भारत हा जागातील सर्वांत जास्त हवामान...
‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तरमुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
सरकारने लोकशाहीचा खून केला : विरोधकांचा...मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधात प्रस्ताव दाखल...
पुणे जिल्ह्यात होणार दोन हजार ९६ पीक... पुणे   ः रब्बी हंगामातील पिकांची...
पुणे जिल्ह्यात ११ हजार कांदा चाळींची...पुणे  ः कांद्याचे अधिक उत्पादन झाल्यास...
लोकपाल, हमीभावासाठी अण्णांचा रामलीलावर...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी...
तेवीस कारखान्यांकडून ७७ लाख ६३ हजार टन... औरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...