Agriculture News in Marathi, crime cases against farmers will be withdrawn, said minister khot, maharashtra | Agrowon

दोषी नसलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ : पणन राज्यमंत्री
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नागपूर : तूर विक्री घोटाळ्यात दोषी नसलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभेत दिले. भाजपचे आमदार मिलिंद माने यांच्या या संदर्भात तारांकित प्रश्न मांडला होता.

नागपूर : तूर विक्री घोटाळ्यात दोषी नसलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी (ता. २०) विधानसभेत दिले. भाजपचे आमदार मिलिंद माने यांच्या या संदर्भात तारांकित प्रश्न मांडला होता.

या वेळी श्री. माने म्हणाले, गेल्या वर्षी राज्यात तुरीचे बंपर उत्पादन आले. त्यामुळे राज्य सरकारने तूर खरेदीसाठी खरेदी केंद्रे सुरू केली. या ठिकाणी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर विक्री करून कोट्यवधी रुपये कमावले. जालना जिल्ह्यातील बनावट नावाने तूर विक्री केल्याप्रकरणी ४९ शेतकरी आणि ९ व्यापाऱ्यांवर स्थानिक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणात शेतकऱ्यांना नाहक गोवण्यात आले आहे. तेव्हा त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला केला.

आमदार वीरेंद्र जगताप यांनीसुद्धा ही मागणी केली. त्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, की या प्रकरणी ७० व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. यात तूर विक्रीतून ९२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले. त्यापैकी ८४ लाख रुपये आरटीजीएस तसेच धनादेशद्वारे व्यापाऱ्यांच्या खात्यांत जमा झाल्याचे आढळून आले आहे. याची चौकशी सुरू आहे.

यात शेतकऱ्यांचा दोष नसल्यास त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील. तसेच याही वर्षी तूर खरेदी सुरू आहे, त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करण्यात आली असल्याचेही श्री. खोत यांनी स्पष्ट केले. तसेच शेतमाल खरेदीबाबत अार्द्रता १२ टक्के असावी, असे नियम आहेत. यात सवलत देण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होतेय तीव्रसातारा ः जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत...
पुणे जिल्ह्यासाठी २६ हजार ५७३ क्विंटल...पुणे  ः खरीप हंगाम सुरू होण्यास एक ते दीड...
तंटामुक्‍त गाव अभियानाला चंद्रपुरात...चंद्रपूर : शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा...
अमरावतीत तुर चुकाऱ्यासाठी हवे ८७ कोटी;... अमरावती : चुकाऱ्यांसाठी यंदा शेतकऱ्यांना...
शेतीच्या दृष्टीने सरकारचा कारभार...नाशिक : अगोदरचा कालखंड व ही पाच वर्षे यात...
अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे...अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे...
शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील...सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद...
कांदा दर वाढले, तेव्हा भाजपने विरोध...नाशिक   ः कृषिमंत्री असताना मी...
'मतदान झालेल्या दुष्काळी भागात ...मुंबई  ः लोकसभेच्या मतदानाच्या तीन...
उच्चांकी मतदानामुळे कोल्हापूर मतदारसंघ...कोल्हापूर  : राज्याच्या तुलनेत कोल्हापूर...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...