agriculture news in Marathi, criminal cases on 148 personas in case of fodder camp fraud, Maharashtra | Agrowon

‘चारा छावणी गैरव्यवहारप्रकरणी १४८ जणांवर गुन्हा’
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

सांगली ः दुष्काळी स्थितीत २०१२ ते २०१३ आणि २०१३-१४ या काळात चारा छावणीत जादा जनावरे दाखवून आणि आदेशाचे उल्लंघन करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी १४८ छावणीचालक व संस्थांवर गुरुवारी (ता. २२) फौजदारी दाखल केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सांगली ः दुष्काळी स्थितीत २०१२ ते २०१३ आणि २०१३-१४ या काळात चारा छावणीत जादा जनावरे दाखवून आणि आदेशाचे उल्लंघन करून गैरव्यवहार केल्याप्रकरणी १४८ छावणीचालक व संस्थांवर गुरुवारी (ता. २२) फौजदारी दाखल केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

काळम म्हणाले, की टंचाई काळात जत, कडेगाव, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी तालुक्‍यांत चारा छावण्या सुरू केल्या होत्या. छावणीचालकांनी शासनाच्या अटी व शर्थीचे उल्लंघन केले होते. त्याची त्या वेळी चौकशी झाली होती. टॅगिंग, बारकोडिंग न करणे, निवारा शेड न उभारणे, कडबाकुट्टी उपलब्ध असून वापर न करणे, जादा जनावरे दाखवणे अशा प्रकारची अनियमितता आढळली होती.

१४८ चारा छावण्यांमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे त्या वेळी छावणीचालकांच्या देयकातून तब्बल ९ कोटी ९९ लाख ३९ हजार २५३ इतकी रक्कम कपात करण्यात आली होती. ही कारवाई अपुरी असल्याबद्दलची जनहित याचिका सांगोला येथील गोरख आनंदा घाडगे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या जनहित याचिकेचे रूपांतर नंतर फौजदारी खटल्यात झाले. न्यायालयाने शासनाला आणि शासनाने जिल्हा प्रशासनाला या प्रकरणी फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले. येथे १५ सप्टेंबर २०१७ रोजी तसे आदेश मिळाले. आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये सध्या सक्षम शासकीय अधिकाऱ्यांच्या दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे, असे कलम लावले आहे. पुढे त्यात आणखी गुन्हे दाखल होतील.

तेव्हाची दंडाची कारवाई
जत तालुक्‍यातील २५ छावणीचालकांना ३.२६ कोटी, कडेगाव तालुक्‍यातील एका छावणीचालकाला १ लाख ३१ हजार, मिरज तालुक्‍यातील एका छावणीचालकाला १ लाख १८ हजार, तासगाव तालुक्‍यातील ३३ छावणीचालकांना ९५ लाख ६७ हजार, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील २४ छावणीचालकांना २.७० कोटी, खानापूर तालुक्‍यातील १५ छावणीचालकांना २२ लाख ७९ हजार, तर आटपाडी तालुक्‍यातील ४९ छावणीचालकांना २ कोटी ८१ लाखांचा दंड केला होता.

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...