agriculture news in marathi, Criminals guilty in Jalgaon fishery case | Agrowon

जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात दोषींवर फौजदारी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील बालकांना देण्यात येणाऱ्या शेवया बुरशीयुक्‍त असल्याचे काही महिन्यांपूर्वी आढळून आले होते. पंचनामा होऊनदेखील याबाबत पुढील कारवाई प्रशासनाकडून झाली नाही, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. याच मुद्यांवरून प्रशासनाला कोंडीत पकडले. सदस्यांकडून आलेल्या मागण्या लक्षात घेता जे पंचनामे शेवयांच्या प्रकरणात झाले आहेत, त्या आधारावर दोन दिवसांत या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी या सभेत दिले.

जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील बालकांना देण्यात येणाऱ्या शेवया बुरशीयुक्‍त असल्याचे काही महिन्यांपूर्वी आढळून आले होते. पंचनामा होऊनदेखील याबाबत पुढील कारवाई प्रशासनाकडून झाली नाही, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. याच मुद्यांवरून प्रशासनाला कोंडीत पकडले. सदस्यांकडून आलेल्या मागण्या लक्षात घेता जे पंचनामे शेवयांच्या प्रकरणात झाले आहेत, त्या आधारावर दोन दिवसांत या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी या सभेत दिले.

ही सभा छत्रपती शाहू महाराज सभागृहात दुपारी झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकलाडे उपस्थित होते. लघुसिंचन विभागातील अनागोंदी, बुरशीयुक्‍त शेवयांच्या मुद्यांसह विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीत पालकांची होणारी लूट या संदर्भात सदस्य आक्रमक झाले.  

पाचोरा तालुक्‍यात अंगणवाडीमध्ये पुरवठा झालेल्या आहारातील शेवयांना बुरशी लागल्याचे आढळून आल्या. अडीच महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभेत सदर मुद्दा उपस्थित होऊनदेखील अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे रावसाहेब पाटील यांनी उपस्थित केला. यावर उपाध्यक्ष महाजन यांनी महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी यांना धारेवर घेत मुलांच्या जिवाशी खेळ सुरू असताना प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरू असल्याचे सांगितले. स्थायी सभेत गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला असताना अजून का नाही? असा सवाल उपस्थित करत सभागृहाने ठराव करण्याचा मुद्दा मांडला. परंतु, ठराव करूनदेखील सभागृहातील शब्द अधिकारी पाळत नसल्याचे सांगत रावसाहेब पाटील यांनी तडवी यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावर सीईओंनी या प्रकरणात दोन दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच, माल थांबविण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश उपाध्यक्ष यांनी दिले.

सीईओंना हॅण्डपंप भेट
जिल्ह्यात बोअरवेलची ५६७ कामे झाले असून, त्यापैकी साडेचारशे ठिकाणी पाणी लागले आहे. परंतु, अद्यापपर्यंत त्यावर हॅण्डपंप बसविले नसल्याचे नाना महाजन यांनी उपस्थित केले. यावरून रावसाहेब पाटील, प्रताप पाटील, रवींद्र पाटील, शशिकांत साळुंके यांनी प्रतिकात्मक हॅण्डपंप सीईओ दिवेकर यांना भेट दिला.

 

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...