agriculture news in marathi, crisis in crop loan distribution, akola, maharashtra | Agrowon

पीक कर्जवाटपाच्या मार्गात अडचणींचे डोंगर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
अकोला  ः गेल्या हंगामासाठी वाटप केलेल्या पीककर्जाची वसुली ५० टक्क्यांच्या अात असून, अागामी हंगामासाठी पीक कर्जवाटप करताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता अाहे. थकीत असलेल्या या पीककर्जाबाबत शासनाकडून ठोस पावले उचलली तरच शेतकऱ्यांना या हंगामात पीक लागवडीसाठी कर्ज मिळू शकेल.
या वर्षात झालेली कर्जमाफीची घोषणा, शेतीमालाला नसलेले भाव, विकलेल्या शेतीमालाचे रखडलेले चुकारे अादी कारणांमुळे बँकांच्या कर्ज वसुलीला थेट ‘ब्रेक’ लागलेला अाहे.
 
अकोला  ः गेल्या हंगामासाठी वाटप केलेल्या पीककर्जाची वसुली ५० टक्क्यांच्या अात असून, अागामी हंगामासाठी पीक कर्जवाटप करताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता अाहे. थकीत असलेल्या या पीककर्जाबाबत शासनाकडून ठोस पावले उचलली तरच शेतकऱ्यांना या हंगामात पीक लागवडीसाठी कर्ज मिळू शकेल.
या वर्षात झालेली कर्जमाफीची घोषणा, शेतीमालाला नसलेले भाव, विकलेल्या शेतीमालाचे रखडलेले चुकारे अादी कारणांमुळे बँकांच्या कर्ज वसुलीला थेट ‘ब्रेक’ लागलेला अाहे.
 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अकोला अाणि वाशीम जिल्ह्यांत अापल्या भागधारकांना गेल्या हंगामात वाटप केलेल्या ५७६ कोटींच्या कर्जापैकी केवळ २५२ कोटी रुपये ३१ मार्च अखेर वसूल झाले. ही वसुली केवळ ४२ टक्के अाहे. एक एप्रिलपासून नवीन अार्थिक वर्ष सुरू झाले. पीक कर्जवाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होत अाहे. सर्व कागदपत्रे व्यवस्थित असलेल्या सभासदांना गुरुवारपासून (ता. ५) बँकेतर्फे पीक कर्जवाटप केले जाणार अाहे.
 
ज्यांनी पीककर्ज भरले अशा सभासदांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग अाहे. मात्र अाज असंख्य शेतकरी असे अाहेत, की ज्यांना कर्जमाफी मिळाली किंवा नाही, हेच स्पष्ट माहिती झालेले नाही. शिवाय जे नियमित खातेदार अाहेत त्यांना पीककर्ज भरण्याची इच्छा असली तरी या वर्षातील पीक परिस्थिती, शेतीमालाला न मिळालेले भाव हे अडसर ठरले.
 
अाता अनेकांनी तूर, हरभरा हमीभावाने शासनाला विकलेला अाहे. परंतु त्याचे चुकारेच झालेले नाहीत. या सर्व बाबी पीककर्ज वसुलीला बाधक ठरल्या. गेल्या हंगामात घेतलेले कर्ज अद्याप ज्यांनी भरलेले नाही, अशांना नवीन हंगामासाठी कर्ज बँका देणार नाहीत हे स्पष्ट अाहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना हंगामाला सामोरे जातांना मोठ्या अडचणी येणार अाहेत.   
 
एकीकडे शासन पीककर्जाच्या मर्यादेत वाढ करीत असल्याचे सांगत अाहे. या वर्षी जिल्ह्याचा पीककर्जाचा अाराखडा हा २०१७-१८ मधील १२०० कोटींच्या तुलनेत १४०५ कोटी करण्यात अाला. ही वाढ जवळपास १७ टक्के अाहे. ही अाकडेवारी मोठी वाटत असली तरी विविध तांत्रिक अडचणींमुळे पुर्ण पीक कर्जवाटपच होत नाही, ही वस्तुस्थिती अाहे. वेळीच उपाययोजना न केल्यास या हंगामात हा अाकडा अाणखी घसरण्याचा अंदाज अातापासूनच व्यक्त होऊ लागला अाहे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...